Gautam Gambhir Press Conference : रोहित शर्माची अनुपस्थिती, राहुल-रोहित-विराटचा फॉर्म यावर गौतम गंभीर काय म्हणाला?

Gautam Gambhir Press Conference : भारतीय संघ बोर्डर-गावस्कर चषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. 

64
Gautam Gambhir Press Conference : रोहित शर्माची अनुपस्थिती, राहुल-रोहित-विराटचा फॉर्म यावर गौतम गंभीर काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

बहुप्रतिक्षित बोर्डर-गावस्कर चषकासाठी भारतीय संघ रविवारी आणि सोमवारी अशा दोन संचांमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. सोमवारी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्यातील आव्हानं, भारतीय संघाची तयारी आणि संभाव्य रणनीती यावर पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली. न्यूझीलंड विरुद्धची मालिका ०-३ ने गमावल्यामुळे भारतीय संघावर दडपण असेल. शिवाय ऑस्ट्रेलियाचा कसोटी दौरा कायमच खडतर मानण्यात येतो. त्यामुळे एकूणच भारतीय संघाचा खरा कस या मालिकेत लागणार आहे. (Gautam Gambhir Press Conference)

अशावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना गौतम गंभीरने काय उत्तरं दिली ते पाहूया,

१. रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होईल का?

‘आताच रोहित शर्माच्या उपलब्धतेविषयी काही सांगता येणार नाही. पण, तो पहिली कसोटी खेळणारच नाही, असंही नाही. तो कदाचित नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाला येऊ शकतो आणि तो आला तर तो पहिली कसोटीही खेळेल. पण, सध्या त्या विषयी काही ठरलेलं नाही. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहची उपकर्णधार म्हणून आधीच नियुक्ती झालेली आहे. तोच संघाचं नेतृत्व करेल. सलामीवीर म्हणून भारताकडे ईश्वरन आणि के. एल. राहुल असे दोन पर्याय आहेत. राहुल यष्टीरक्षणही करू शकतो.’ (Gautam Gambhir Press Conference)

(हेही वाचा – Ind vs SA, 2nd T20 : संजू सॅमसनच्या नावावर एक नकोसा विक्रम; पुन्हा शून्यावर बाद )

२. प्रशिक्षक म्हणून आतापर्यंत झालेली टीका

‘मी ही जबाबदारी स्वीकारली तेव्हाच मला ती कठीण आहे याची जाणीव होती. ही जबाबदारी प्रतीष्ठेची आहे. तशीच ती काटेरीही आहे. आतापर्यंत पदरात आलेले पराभव आम्ही स्वीकारले आहेत. खेळाच्या प्रत्येक अंगात आम्ही कमी पडलो. आणि त्यासाठी आमच्यावर झालेली टीकाही आम्ही मान्य केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तयारी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्या दृष्टीने उर्वरित १० दिवस निर्णायक ठरतील. तिथेच आमच्यासाठी मालिकेची दिशा ठरेल.’ (Gautam Gambhir Press Conference)

३. रोहित शर्मा, विराट कोहलीचा फॉर्म

‘मला रोहित, विराटच्या फॉर्मची चिंता वाटत नाही. माझ्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये धावांची भूक महत्त्वाची आहे. ती जोपर्यंत या दोघांमध्ये आहे तोपर्यंत ते संघासाठी हवेसे आहेत. ऑस्ट्रेलियन वातावरणात खेळण्याचा अनुभव असलेले ज्येष्ठ खेळाडू संघात असणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा तरुणांना होणार आहे.’ (Gautam Gambhir Press Conference)

(हेही वाचा – Rohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही )

४. के. एल. राहुलचं अपयश

‘जगभरातील कुठल्या संघांमध्ये के. एल. राहुल सारखे दर्जेदार खेळाडू आहेत? तो असा खेळाडू आहे जो सलामीपासून ते सहाव्या क्रमांकापर्यंत कुठेही खेळू शकतो. कसोटीच्या दोन्ही डावांत यष्टीरक्षण करू शकतो. त्याची उपयुक्तता, अनुभव आणि आतापर्यंतची आकडेवारी सगळं चांगलं आहे.’ (Gautam Gambhir Press Conference)

५. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी, गोलंदाजांचा फॉर्म

‘ऑस्ट्रेलियात कशा खेळपट्ट्या असतील यावर आमचं नियंत्रण नाही. जे समोर वाढून ठेवलेलं असेल तेच आम्हाला स्वीकारावं लागेल. खेळपट्टीवर गवत असो, उसळणारी खेळपट्टी असो किंवा फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असो, खेळपट्टी जशी असेल तसं आम्हाला खेळावं लागेल आणि तेच योग्य आहे. आम्हाला फक्त खेळण्याची तयारी चांगली करावी लागेल. गोलंदाजीत आमच्याकडे जे सर्वोत्तम पर्याय आहेत, ते आम्ही निवडले आहेत. हर्षित आणि प्रसिधही खूप चांगले आहेत. पाचही दिवस वर्चस्व राखू शकतील आणि प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण असलेले गोलंदाज आमच्याकडे आहेत.’ (Gautam Gambhir Press Conference)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.