Gautam Gambhir Report Card : गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारवर

Gautam Gambhir Report Card : टी-२० वगळता, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भोपळे

58
Gautam Gambhir Report Card : गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारवर
Gautam Gambhir Report Card : गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारवर
  • ऋजुता लुकतुके

कसोटी क्रिकेट हा अजूनही क्रिकेटचा गाभा मानला जातो. सातत्याने पाच दिवसा चांगला खेळ केल्याशिवाय निर्णयाक विजय मिळवता येत नाही. आणि म्हणून कसोटीला महत्त्व आहे. कसोटीतील कामगिरीचा निकष लावला तर भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला स्वत:ला चांगलंच सिद्ध करावं लागणार आहे. शिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याचा रेकॉर्ड काही बरा नाहीए. २०२४ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेतेपद मिळालं, त्यात संघाचा मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीरने मोलाची भूमिका निभावली. त्याच्या जोरावर संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याला संधी मिळाली. (Gautam Gambhir Report Card)

(हेही वाचा- भारतद्वेष्टे George Soros यांना मिळणार अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान)

पण, टी-२० वगळता, इतर दोन्ही प्रकारात भारतीय खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणं गंभीरला जमलेलं नाही. उलट भारतीय ड्रेसिंग रुममध्ये दोन तट पडल्याच्या बातम्यांनी त्याचं स्वागत झालं आहे. आणि मैदानावरील कामगिरी सोडाच, पण, अश्विनने अर्ध्या मालिकेत निवृत्ती स्वीकारणं, रोहीतचे फलंदाजीचे क्रम सतत बदलणं, अखेर त्याला पाचव्या कसोटीत संघाबाहेर बसवणं अशा त्याच्या निर्णयांचीही येणाऱ्या दिवसांत मीमांसा होणार आहे. (Gautam Gambhir Report Card)

गौतम गंभीरने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून ज्या खेळाडूंची नावं घेतली, ते खेळाडू त्याला मिळाले. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर, गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून मॉर्नी मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रायन टेन ड्युसकाटे असा ताफा त्याच्याकडे आहे. पण, भारतीय संघातील तांत्रिक चुका हा ताफा का निस्तारू शकला नाही, याचं उत्तर आता त्यांना द्यावं लागणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२०त ६ पैकी ६ विजय मिळवले आहेत. बाकी संघाची पाटी कोरीच आहे. (Gautam Gambhir Report Card)

सामने

विजय

पराभव

बरोबरी/अनिर्णित

यशाची टक्केवारी

कसोटी

१०

३०%

एकदिवसीय 

टी-२०

१००%

 

बोर्डर गावसकर मालिकेनंतर तर दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी गंभीर यांच्या प्रशिक्षकांच्या ताफ्याला धारेवर धरलं आहे. खेळाडू सातत्याने खराब कामगिरी करत असताना, प्रशिक्षक काय करत होते, असा त्यांचा सवाल आहे. ‘प्रशिक्षकांच्या ताफ्याला कठीण प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंड विरुद्ध संध ४६ धावांमध्ये सर्वबाद झाल्यानंतर त्यांनी काय केलं? फलंदाज सातत्याने चुका करत असताना, ते काय करत होते? गोलंदाजांना त्यांची लय का सापडत नव्हती? प्रशिक्षकांची भूमिका नेमकी काय आहे? खेळाडूंमध्ये इतके दिवस सुधारणाच कशी दिसली नाही. चांगल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर ठिक आहे. पण, खराब चेंडूवरही ते का बाद होत होते? याचा अर्थ व्यवस्थेतच गोंधळ आहे. आणि हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत,’ असं गावसकर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर समालोचन करताना म्हणाले. (Gautam Gambhir Report Card)

(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy : चॅम्पियन्स करंडकानंतर गौतम गंभीर यांची गच्छंती? भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्याची शक्यता )

भारतीय संघाच्या कामगिरीवर बीसीसीआयमध्येही चर्चा अपेक्षित आहे. १२ जानेवारीला बीसीसीआयच्या सचिवपदी देवजीत साकिया पदभार स्वीकारतील. त्यानंतर बीसीसीआयची कार्यकारिणी पूर्ण होईल. आणि भारतीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीवरही तेव्हाच चर्चा होईल. आणि रडारवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर असणार आहेत. (Gautam Gambhir Report Card)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.