- ऋजुता लुकतुके
लिजंड्स लीग स्पर्धेत गंभीर आणि श्रीशांत यांच्यात भांडण झालं त्या क्षणाचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
भारतीय संघातील दोन माजी खेळाडू गौतम गंभीर आणि श्रीशांत यांच्यात ६ डिसेंबरला लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत मैदानावरच बाचाबाची झाली. खरंतर गंभीर आणि श्रीशांत दोघेही २००७ चा टी-२० विश्वचषक विजेता संघ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघात एकत्र खेळले आहेत. पण, लिजंड्स लीगमध्ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमने सामने आले तेव्हा दोघांमध्ये खडाजंगी झाली आणि शेवटी संघातील इतर खेळाडूंना दोघांना बाजूला करावं लागलं.
त्यानंतर आता क्रिकेट वर्तुळात मोठा वाद उभा राहिला आहे. श्रीशांतच्या गोलंदाजीवर दुसऱ्याच षटकांत गंभीरने एक षटकार आणि लागोपाठ एक चौकार लगावला. त्यावर श्रीशांतने गंभीरवर नजर रोखून आपला राग व्यक्त केला आणि गंभीरनेही त्याची तशीच परतफेड केली. पण, पुढच्या एका चेंडूवर एकेरी धाव घेतल्यावर दोघं खेळपट्टीच्या एकाच बाजूला आहे आणि थेट दोघांमध्ये वाद सुरू झाला.
(हेही वाचा – GST Amendment Bill : जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर)
सामना संपल्यानंतर श्रीशांतने इन्स्टाग्राम लाईव्ह करून झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि गंभीरने आपला उल्लेख वारंवार फिक्सर असा केला असा आरोप त्याच्यावर केला. तर गंभीरने जेव्हा सगळं जग तुमच्याकडे रोखून बघत असतं तेव्हा चेहऱ्यावर फक्त स्मित ठेवायचं असं म्हणत एक ट्विट केलं.
दोघांमधील भांडणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे आणि यात भांडणानंतर इतर खेळाडू दोघांना वेगळं करताना दिसत आहेत.
Emotions are always running high, when you were very passionate about your game.
Sreesanth and Gambhir in an animated chat during the @llct20 Eliminator!#LegendsLeagueCricket pic.twitter.com/Qjz8LqC41l
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 6, 2023
(हेही वाचा – Padgha NIA Raid : भिवंडीतील पडघा गाव एनआयए च्या रडारवर)
२०१३ च्या आयपीएल दरम्यान श्रीशांतवर स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप झाला होता. त्याच्यावर पोलीस कारवाईही झाली आणि बीसीसीआयनेही त्याच्यावर बंदी लादली होती. कोर्टात काही काल खटला चालल्यानंतर श्रीशांत आणि इतर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर २०२१ मध्ये बंदीची मुदत संपल्यावर श्रीशांत पुन्हा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला लागला आहे.
त्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन गंभीरने त्याला फिक्सर असं चिडवल्याचं श्रीशांतचं म्हणणं आहे. तर लिजंड्स लीगने श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावली आहे. तर झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याचं जाहीर केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community