- ऋजुता लुकतुके
२७ जुलैला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यातील (Sri Lanka tours) आपला पहिला सामना खेळेल, तेव्हा गौतम गंभीरसाठी (Gautam Gambhir) कारकीर्दीतील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात असेल. भारतीय संघ हा क्रिकेट विश्वातील सगळ्यात श्रीमंत पण, म्हणून सगळ्यात व्यस्त संघ आहे. अशावेळी क्रिकेटचा सततचा ताण आणि तंदुरुस्तीवर होणारा परिणाम यावर सतत चर्चा होत असते. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनीही आल्या आल्याच यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
(हेही वाचा- Gautam Gambhir : गंभीरच्या पसंतीच्या सपोर्ट स्टाफवर बीसीसीआयची फुली?)
‘दुखापतींचं व्यवस्थापन’ ही संकल्पना आपण मानत नाही, असं गंभीरने स्पष्टपणे सांगून टाकलं आहे. ‘खेळाडू तंदुरुस्त असतील आणि ते फॉर्ममध्ये असतील तर त्यांनी तीनही प्रकारचं क्रिकेट खेळावं,’ असं गंभीरने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे. ‘खेळाडूंनी तीनही प्रकार खेळणं किवा न खेळणं आणि दुखापतींचं व्यवस्थापन यांचा परस्पर संबंध मी मानत नाही. तुम्हाला दुखापत झालेली असेल तर तुम्ही विश्रांती घ्या, उपचार घ्या आणि बरे होऊन परत मैदानात उतरा, इतकं ते सोपं आहे. त्यावर वेगळ्या व्यवस्थापनाची गरज नाही,’ असं गंभीरचं म्हणणं आहे. (Gautam Gambhir)
If 𝐠𝐞𝐭𝐭𝐢𝐧𝐠 𝐬𝐭𝐫𝐚𝐢𝐠𝐡𝐭 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐩𝐨𝐢𝐧𝐭 was a person, it would be @GautamGambhir 💪
Once a match-winner on the field, he now takes the helm as head coach of #TeamIndia 😍#MenInBlue #Cricket pic.twitter.com/qdtaLiNdHv
— Star Sports (@StarSportsIndia) July 12, 2024
४२ व्या वर्षी गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा वयाने सर्वात लहान प्रशिक्षक असणार आहे. भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम आणि खेळाडूंचं कौशल्य पाहता ठरावीक खेळाडूंनी टी-२० क्रिकेट (T20 cricket) खेळावं आणि ठरावीक खेळाडूंनी कसोटीवरच लक्ष केंद्रीत करावं, अशी रणनीती गौतम गंभीर आखेल असा अंदाज व्यक्त केला जात होता.
(हेही वाचा- Jammu-Kashmir संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची ताकद वाढणार)
पण, गंभीरने ही कल्पना उडवून लावली आहे. खेळाडूंची कारकीर्द जास्तीत जास्त १० – १५ वर्षांची असते. या कालावधीत त्यांनी जमेल तेवढं क्रिकेट खेळावं असं मत त्याने व्यक्त केलं आहे. (Gautam Gambhir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community