Glenn Maxwell Carnage : ग्लेन मॅक्सवेलचं रोमांचक द्विशतक, मोडले विश्वचषकातील खंडीभर विक्रम 

ऑस्ट्रेलियाचा सहाव्या क्रमांकाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने या विश्वचषकातील दुसरं शतक ठोकताना संघाला अफगाणिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याने नाबाद २०१ धावा करताना खंडीभर विक्रम मोडले 

139
Glenn Maxwell Carnage : ग्लेन मॅक्सवेलचं रोमांचक द्विशतक, मोडले विश्वचषकातील खंडीभर विक्रम 
Glenn Maxwell Carnage : ग्लेन मॅक्सवेलचं रोमांचक द्विशतक, मोडले विश्वचषकातील खंडीभर विक्रम 

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९३ धावांची गरज होती. त्यांनी त्या पूर्णही केल्या. पण, त्यातल्या २०१ धावा एकट्या ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell Carnage) केल्या. ते सुद्धा ७ बाद ९१ अशी संघाची अवस्था असताना त्याने जबाबदारी उचलली. चक्क शिवधनुष्य एका पायावर पेललं. एका पायावर कारण, फलंदाजी करताना त्याच्या डाव्या पायाची नस दुखावली. तिथून पुढे त्याला त्या पायावर जोरही देता येत नव्हता. तरीही त्याने एकहाती ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला.

त्याने २०१ धावा केल्या त्या १२८ चेंडूंमध्ये. यात त्याने १० षटकार आणि २१ चौकार लगावले. मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell Carnage) या अद्भूत खेळीचं कौतुक तर होतंच आहे. त्याने या खेळीदरम्यान खंडीभर विक्रमही मोडले आहेत. त्यावर एक नजर टाकूया…

  • धावांचा पाठलाग करताना केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. मॅक्सवेलने त्यासाठी पाकच्या फखर झमानचा विक्रम मोडीत काढला आहे. फखरने २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९३ धावा केल्या होत्या. पण, तेव्हा पाक संघ ङरला होता.

  • ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell Carnage) हा एकदिवसीय द्विशतक ठोकणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. यापूर्वी शेन वॉटसनच्या १८५ धावा ही ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. २०११ मध्ये मिरपूरला शेन वॉटसनने बांगलादेश विरुद्ध या धावा केल्या होत्या.

  • सहाव्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्‌वी कपिल देवने १९८३ च्या विश्वचषकात झिंबाब्वेविरुद्ध १७५ धावा केल्या होत्या.

    (हेही वाचा-Virat Kohli in Indigo Flight : विराट कोहली जेव्हा इंडिगोच्या इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो)

  • सलामीवीर सोडून इतर फलंदाजांनी केलेल्या या सर्वोत्तम वैयक्तिक धावा आहेत. यापूर्वी २००९ मध्ये झिंबाब्वेच्या चार्ल्स कोव्हेंट्रीने १९४ धावा केल्या होत्या.

  • मॅक्सवेलने आपलं द्विशतक १२८ चेंडूंमध्ये पूर्ण केलं. हे दुसऱ्या क्रमांकाचां वेगवान द्विशतक आहे. यापूर्वी ईशान किशनने गेल्यावर्षी बांगलादेश विरुद्ध केलेलं द्विशतक १२६ चेंडूंत केलं होतं.

  • विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हे तिसरं द्विशतक आहे. यापूर्वी मार्टिन गपटिल (२३७) आणि ख्रिस गेल (२१५) यांनी २०१५ च्या विश्वचषकात द्विशतक ठोकलं होतं.

  • मॅक्सवेलने पॅट कमिन्सबरोबर आठव्या गड्यासाठी नाबाद २०२ धावांची भागिदारी केली. आठव्या गड्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोत्तम भागिदारी आहे. यापूर्वी जस्टिन केंप आणि अँड्र्यू हॉल यांनी १३८ धावा केल्या होत्या.

  • २९१ धावांचा पाठलाग हा वानखेडे मैदानावरील सर्वोत्तम पाठलाग आहे. आणि ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषकातील धावांचा पाठलाग करतानाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

    हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=805y8EmcjYM&t=3s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.