- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) शनिवारी ख्राईस्टचर्चच्या मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक आणि मैदानावरील खेळाडूंनाही थक्क करणारा एक अवघड झेल टिपला. या झेलानंतर फिलिप्सला (Glenn Phillips) जगभर सुपरमॅन फिलिप्स म्हटलं जात आहे. ख्राईस्टचर्च कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा क्षण आला. (Glenn Phillips Superman Catch)
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ६१ व्या षटकात मार्कस लेबुशेन टीम साऊदीला खेळत होता. यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू लेबुशेनने जोरात टोलावला. पण, हा आक्रमक फटका ग्लेन फिलिप्सने (Glenn Philips) हवेत सूर मारून पकडला. त्याच्या चपळतेनं मैदानातील खेळाडूही थक्क झाले. आधी तो झेल पाहूया. (Glenn Phillips Superman Catch)
SUPERMAN! 🦸 What a catch from Glenn Phillips! Australia are 221/8 at lunch on Day 2 🏏@BLACKCAPS v Australia: 2nd Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/Swx84jNFZb
— TVNZ+ (@TVNZ) March 9, 2024
(हेही वाचा – Muslim : रस्त्यावर नमाज पडणाऱ्या मुसलमानांचा पूर्ण व्हिडीओ आला समोर; मुसलमानांकडून पोलिसांना आधी मारहाण)
फिलिप्सने (Glenn Phillips) प्रतिक्षिप्त क्रियेनं हा झेल पकडला. आणि त्यामुळे लेबुशेनची ९० धावांची खेळी संपुष्टात आली. आणि पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २५६ धावांत गुंडाळला गेला. न्यूझीलंडने पहिल्या डावात १६४ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी तर मिळाली. न्यूझीलंडकडून मॅट प्रायरने डावात ७ बळी टिपले. (Glenn Phillips Superman Catch)
पण, दुसऱ्या डावात न्यूझीलंडने दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे कसोटीत रंगत निर्माण झाली आहे. पण, चर्चा ग्लेन फिलिप्सच्या (Glenn Phillips) झेलाचीच होत राहिली. (Glenn Phillips Superman Catch)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community