गोल्डन बाॅय नीरजने पुन्हा घडवला इतिहास, प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा जिंकली

भारताचा गोल्डन बाॅय भाालफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग फायनल जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अॅथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल झाली. या स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले. नीरज 2017 आणि 2018 मध्येही फायनलसाठी पात्र ठरला होता. मात्र, त्यानंतर त्यांना अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

गेल्या महिन्यात लुसाने डायमंड लीग स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावले होते आणि झुरिचमध्ये प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत धडक मारली होती. या डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. दुस-या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला. तिस-या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर तर पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला. या अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकचा जेकोब 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा, तर जर्मनीचा ज्युनिलय वेबर 83.73 मीटर फेकसह तिस-या क्रमांकावर राहिला.

( हेही वाचा: साता-यातील शिवसेनेचा युवा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील )

नीरजने भाराताचा गौरव वाढवला 

नीरजने 2021 मध्ये ऑलम्पिकमध्ये सुवर्ण, 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2022 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here