गोल्डन बाॅय निरज चोप्राची कमाल; मोडला राष्ट्रीय विक्रम

123

टोकियो ऑलम्पिकमध्ये  ऐतिहासिक कामगिरी करत, सुवर्णपदक पटकावणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने आता आणखी एक विक्रम नावावर नोंदवला आहे. सध्या फिनलॅंडमधील पावो नुर्मी गेम्स 2022 मध्ये निरज चोप्रा सहभागी झाला आहे. त्याठिकाणी त्याने 89.30 मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक पटकावले. सोबतच त्याने टोकियो ऑलम्पिकमध्ये नोंदवलेला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. टोकियो ऑल्मपिकनंतर नीरज चोप्रा स्पर्धेत उतरला आहे.

फिनलॅंडमधील स्पर्धेत 25 वर्षीय ऑलिव्हर हेलॅंडर या फिनलॅंडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने 89.83 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या सर्वोत्तम कामगिरीशिवाय, त्याने 88.02 मीटर आणि 80.36 मीटर अशी कामगिरी नोंदवली.

( हेही वाचा: ‘त्या’ मुलांचाही आता संपत्तीत वाटा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय )

आपलाच विक्रम मोडला

नीरज चोप्राचा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 88.07 मीटर होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. त्याने 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले. आता पुढील वर्षी होणा-या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.