Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, जसप्रीत बुमराह क्रिकेट अकादमीत करतोय गोलंदाजी

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटपासून दूर आहे.

45
Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, जसप्रीत बुमराह क्रिकेट अकादमीत करतोय गोलंदाजी
Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, जसप्रीत बुमराह क्रिकेट अकादमीत करतोय गोलंदाजी
  • ऋजुता लुकतुके

भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नेट्समध्ये गोलंदाजी पुन्हा सुरू केली आहे. मुंबई इंडियन्ससाठी खासकरूनही चांगली बातमी आहे. जानेवारी २०२५ पासून पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात बुमराहची पाठ अघडली. आणि या डावात तो गोलंदाजीही करू शकला नव्हता. पण, आता मुंबई इंडियन्सला तो लवकर मैदानात परतेल यासाठी आशा बाळगता येईल.

सिडनी कसोटीनंतर जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश चॅम्पियन्स करंडकासाठी (Champions Trophy) भारतीय संघात झाला होता. पण, नंतर त्याचं नाव दुखापतीमुळेच हटवण्यात आलं. त्याच्या ऐवजी हर्षित राणाचा (Harshit Rana) समावेश भारतीय संघात करण्यात आला. ‘जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah)  ३० मार्चपासून नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. पण, तो मुंबईच्या ताफ्यात कधी परतेल हे अजून सांगता येत नाही,’ असं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(हेही वाचा – यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती आणि अनुवाद मंडळ स्थापन करणार; मंत्री Uday Samant यांची घोषणा )

बुमराहच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि हार्दिक पंड्यावर (Hardik Pandya) मुंबईच्या तेज गोलंदाजीची जबाबदारी आली आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धचा सामना ४ गडी राखून गमावला. तर दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध ३६ धावांनी गमावला. आता नवीन अपडेटनुसार, एप्रिलच्या मध्यावर बुमराह मुंबई इंडियन्समध्ये शामील होऊ शकेल. २०१३ मध्ये जसप्रीत बुमराह पहिल्यांदा मुंबई इंडियन्सशी करारबद्ध झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध बुमराह (Jasprit Bumrah) आपला पहिला सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ३२ धावांमध्ये ३ बळीही मिळवले होते.

तेव्हापासून तो कायम मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग राहिला आहे. आणि आतापर्यंत १३२ सामन्यांमध्ये त्याने १६५ बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये डावांत ५ बळी दोनदा टिपणाऱ्या मोजक्या चार गोलंदाजांमध्ये एक जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.