पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रोतून रात्री ११ पर्यंत प्रवास करता येणार

89

प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मेट्रोची वेळ रात्री दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय ‘महामेट्रो’ने घेतला आहे. त्यामुळे प्रवासी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रोने प्रवास करू शकणार आहे. पुण्यात मेट्रोची वेळ सध्या सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे.

(हेही वाचा – अफगाणिस्तानच्या काबूलमधील रशियन दूतावासाजवळ स्फोट; 20 लोकांचा मृत्यू)

मेट्रोच्या वेळेत दोन तासांनी वाढ

गणेशोत्सवामुळे बाहेर गावचे अनेक नागरिक शहरात येत आहेत. कुतूहल म्हणून ते मेट्रोमधून प्रवास करीत आहेत. हे लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळेत दोन तासांनी वाढ करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. हा बदल ९ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

दर ३० मिनिटांनी मेट्रो उपलब्ध

या काळात दर ३० मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध होईल. पिंपरी चिंचवड- फुगेवाडी दरोम्यानच्या मेट्रो मार्गाच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.