Goodbye 2024 : वर्षातील भारताचा सर्वाधिक ‘यशस्वी’ फलंदाज

यशस्वीने २०२४ मध्ये १,४७८ धावा केल्या आहेत.

71
Goodbye 2024 : वर्षातील भारताचा सर्वाधिक ‘यशस्वी’ फलंदाज
Goodbye 2024 : वर्षातील भारताचा सर्वाधिक ‘यशस्वी’ फलंदाज
  • ऋजुता लुकतुके

बॉक्सिंग डे कसोटीतील (Boxing Day Test) अर्धशतकासह युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आणखी एक यशस्वी आंतरराष्ट्रीय वर्ष संपवलं आहे. या मालिकेतील सलग दुसरं अर्धशतक त्याने झळकावलं. आणि १ शतक, २ अर्धशतकांसह तो मलिकेतील सगळ्यात यशस्वी भारतीय फलंदाज ठरला आहे. कसोटीवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असलं आणि त्यांनीच कसोटी जिंकली असली तरी भारतीय संघाला वाचवण्याचा प्रयत्न दोन्ही डावांत यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) केला. (Goodbye 2024)

पहिल्या कसोटीत यशस्वीने (Yashasvi Jaiswal) विराटबरोबर दमदार भागिदारी करत स्वत: ८२ धावा केल्या. दुसऱ्या डावांत भारतीय संघासमोर ३४० धावांचं आव्हान असताना यशस्वीने २०८ चेंडूंत ८४ धावा केल्या. संघाला गरज असताना त्याने बचावात्मक खेळही केला. जयस्वाल बाद झाल्यावर भारतीय प्रतिकारही संपला. आणि अख्खा संघ १५५ धावांत बाद झाला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या रेकॉर्ड बुकमध्ये यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) नोंद झाली आहे. या मैदानावर दोन्ही डावांत ७५ पेक्षा जास्त धावा करणारा मागच्या ३७ वर्षांतील तो फक्त दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन क्रोने १९८७ मध्ये ही कामगिरी केली होती. (Goodbye 2024)

शिवाय यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या वर्षातील भारताचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरला आहे. यावर्षी १५ सामन्यांमध्ये ५४ धावांच्या सरासरीने यशस्वीने १,४७८ धावा केल्या आहेत. यात ३ शतकं आणि ९ अर्धशतकं आहेत. एकट्या इंग्लंडच्या जो रुटने यावर्षी यशस्वीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रुटने १७ कसोटींत ५५.५७ धावांच्या सरासरीने १,५५६ धावा केल्या आहेत. (Goodbye 2024)

(हेही वाचा – शहरातील रस्ते कामाची ACB कडे तक्रार, नार्वेकर यांची चौकशी करण्याची मागणी)

२०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा
जो रुट (इंग्लंड) – १,५५६
यशस्वी जयसवाल (भारत) – १,४७८
बेन डकेट (इंग्लंड) – १,१४९
हॅरी ब्रूक (इंग्लंड) – १,१००
कामिंदू मेंडिस (श्रीलंका) – १,०४९

भारतापुरतं बोलायचं झालं तर यशस्वीने त्याच्या पुढचा यशस्वी फलंदाज शुभमन गिलला (८६६) खूप मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे. एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मागे टाकण्यात मात्र यशस्वी थोडा कमी पडला. एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आघाडीवर आहे. त्याने २०१० साली १,६५२ धावा केल्या होत्या. यशस्वी या बाबतीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Goodbye 2024)

(हेही वाचा – 31 December 2024 : सावधान ! नाशिकमध्ये गुरुजींना बारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश)

वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर – १,५६२ (२०१०)
सुनील गावसकर – १,५५५ (१९७९)
यशस्वी जयसवाल – १,४७८ (२०२४)
विरेंद्र सेहवाग – १,४६२ (२००८)
विरेंद्र सेहवाग – १,४२२ (२०१०)

२०२३ मध्ये यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) भारताकडून पहिली कसोटी खेळला. आणि तेव्हापासून तो भारताचा भरवशाचा सलामीवीर झाला आहे. तीनही प्रकारात तो भारताकडून खेळतो. आणि १८ कसोटींत त्याने १,७६६ धावा केल्या आहेत. यात ४ शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय सलामीला मोठी खेळी उभारण्यात तो माहीर आहे. यंदा इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम इथं त्याने २०९ धावा केल्या होत्या. आणि त्याच मालिकेत राजकोटला त्याने २१४ धावा केल्या होत्या. तर आताही ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच पर्थ कसोटीत त्याने १६१ धावांची मॅरेथॉन खेळी केली. (Goodbye 2024)

राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीकडून खेळताना तेव्हाचे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी जयस्वालला हेरलं. तिथून भारतीय संघातील त्याचा प्रवेश आणि आतापर्यंतची वाटचाल यशस्वी ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.