Goodbye 2024 : मनूची दोन ऑलिम्पिक पदकं आणि गुकेशचं जगज्जेतेपद, २०२४ वर्षातील क्रीडा विषयक ठळक घडामोडी 

Goodbye 2024 : यंदाचं वर्ष सांघिक खेळांसाठी विक्रमांनी भरलेलं होतं

38
Goodbye 2024 : मनूची दोन ऑलिम्पिक पदकं आणि गुकेशचं जगज्जेतेपद, २०२४ वर्षातील क्रीडा विषयक ठळक घडामोडी 
Goodbye 2024 : मनूची दोन ऑलिम्पिक पदकं आणि गुकेशचं जगज्जेतेपद, २०२४ वर्षातील क्रीडा विषयक ठळक घडामोडी 
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक, पुढे बुद्धिबळ ऑलिम्पियाड आणि वर्षाच्या अखेरीस डी गुकेशने मिळवलेलं जगज्जेतेपद आणि कोनेरू हम्पीने बुद्धिबळ रॅपिड विश्वचषकात मिळवलेलं यश, असं हे वर्षं भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गेलं. या वर्षातील ठळक घडामोडी बघूया. (Goodbye 2024)

(हेही वाचा- नवीन वर्षानिमित्ताने Mahavitaran ग्राहकांना देणार नवीन भेट)

टी-२० विश्वचषक 

क्रीडा जगतात भारतीय संघाचा डंका पहिल्यांदा वाजला तो या स्पर्धेनं. २०२३ च्या नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून चुटपूट लागणारा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर खूप कमी वेळात भारतीय संघ पुन्हा एकत्र आला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी-२० विश्वचषकापर्यंत संघाबरोबर राहण्याची विनंती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली. आणि भारतीय संघाने एक निकराचा प्रयत्न करायचा ठरवला. एरवी राहुल द्रविड यांची कारकीर्द गौरवशाली ठरली होती. एकदिवसीय आणि कसोटीतही भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल होता. पण, संघाला १३ वर्षांत आयसीसी विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. आणि ती कसर द्रविड यांच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भरून काढली ती टी-२० विश्वचषकात. अंतिम फेरीत सगळे साखळी सामने जिंकून भारतीय संघाने अंतिम फेरीत मजल मारली. आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी निसटता पराभव करत भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत विराट कोहलीच्या ७६ धावा, अर्शदीप आणि बुमराहची अचूक गोलंदाजी आणि सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा पकडलेला झेल यामुळे भारताने हा सामना आरामात जिंकला. (Goodbye 2024)

ही स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेत खेळवली गेली. आणि एकूण २० संघ यात सहभागी झाले. अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय टी-२० संघात स्थित्यंतर सुरू झालं. पण, त्यासाठी संघ तयार असल्याचं पुढील दिवसांमध्ये दिसलं. संघाचा टी-२० कर्णधार म्हणून रोहीतनंतर सुर्यकुमार यादवने धुरा हातात घेतली. (Goodbye 2024)

(हेही वाचा- लोकसभेत BJP ला फटका; विधानसभेत ‘मविआ’च्या स्वप्नांचा चुराडा; राजकारण्यांना २०२४ ने शिकवला धडा)

पॅरिस ऑलिम्पिक 

टी-२० विश्वचषकानंतर एका महिन्याच्या आत २६ जुलैला पॅरिसमध्ये ऑलिम्पिकला सुरुवात झाली. भारताच्या ११० खेळाडूंनी यात भाग घेतला होता. दुहेरी पदकांचं लक्ष्य भारतीय संघाने ठेवलं खरं. पण, बॅडमिंटन, कुस्ती आणि मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारांमध्ये झालेल्या अनपेक्षित पराभवांमुळे अखेर भारताला १ रौप्य आणि ५ कांस्य जिंकता आली. भालाफेकीत नीरज कुमारने रौप्य जिंकलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरवर भालाफेक करत नीरजला मागे टाकलं. पण, नीरजने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकली. तर मनू भाकेर एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदकं जिँकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. १० मीटर एअर रायफल प्रकारात तिने वैयक्तिक आणि मिश्र सांघिक प्रकारात कांस्य जिंकलं. मनू भाकेरसह सरबजित सिंगनेही कांस्य जिंकलं. तर भारताचा आणखी एक नेमबाज स्वप्निल कुसाळेनं ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात तर अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य जिंकलं. भारताच्या हॉकी संघाने टोकयो पाठोपाठ पॅरिसमध्येही कांस्य जिंकलं. (Goodbye 2024)

बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन पदकाच्या अगदी जवळ येऊनही मानसिक कणखरतेत कमी पडला. आणि पदकांचे दोन्ही सामने त्याने आघाडीवर असताना गमावले. (Goodbye 2024)

तर महिलांच्या कुस्तीत ५० किलो वजनी गटात विनेश फोगाट वजन २०० ग्रॅम जास्त भरल्यामुळे स्पर्धेतून बाद झाली. अंतिम फेरीत पोहोचून तिने रौप्य निश्चित केलं होतं. पण, ते वजनामुळे हुकलं. (Goodbye 2024)

(हेही वाचा- मुख्यमंत्री आरोपीची हयगय करतील असे वाटत नाही; Pravin Darekar यांचा विश्वास)

पॅरिस पॅरालिम्पिक खेळ 

पॅरिस ऑलिम्पिकच्या मागोमाग झालेल्या पॅरालिम्पिक खेळांत मात्र भारतीय पॅराॲथलीटनी २९ पदकांची लयलूट केली. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकं होती. सुवर्ण पदकांचा दुहेरी आकडा गाठण्यात मात्र संघ अपयशी ठरला. अवनी लेखरा, कुमार नितेश, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, प्रवीण कुमार आणि नवदीप सिंग या पॅराॲथलीटनी सुवर्णाला गवसणी घातली. प्रवीण कुमारला खेलरत्न पुरस्कारही वर्षअखेरीस जाहीर झाला आहे. (Goodbye 2024)

बुद्धिबळ ऑलिम्पियाड 

बुद्धिबळ खेळात यंदा भारताचा डंका होता. आणि त्याची सुरुवात झाली बुद्धिबळ ऑलिम्पियाडने. १० ते २३ सप्टेंबर दरम्यान हंगेरीत झालेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिलांच्या संघानेही विजेतेपद पटकावली. भारताचा डी गुकेश खुल्या गटातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. तर गुकेश, अर्जुन एरिगसी, प्रग्यानंदा, हरिकृष्णा आणि विदिथ गुजराथी यांच्या भारतीय संघाने खुली स्पर्धा जिंकली. तर महिला गटात हरिका, आर वैशाली, दिव्या देशमुख, वन्तिका अगरवाल आणि तानिया सचदेव या भारतीय चमूने विजय मिळवला. ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. आणि त्यातच दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावलं. (Goodbye 2024)

या स्पर्धेच्या पूर्वीच भारताच्या डी गुकेशने एप्रिलमध्ये कॅन्डिडेट्स चषक स्पर्धा जिंकून जगज्जेतेपदाच्या लढतीत आव्हानवीर होण्याचा मान मिळवला होता. चीनच्या डिंग लिरेनशी त्याचा मुकाबला डिसेंबरमध्ये झाला. (Goodbye 2024)

(हेही वाचा- नववर्षानिमित्त बुधवार पहाटे ३ वाजल्यापासून Shri Siddhivinayak दर्शन सुरू होणार)

बुद्धिबळ विश्वविजेतेपद 

डी. गुकेशची जगज्जेतेपदाची लढत सुरू झाली त्याच्या काही दिवस आधीच भारताच्याच अर्जुन एरिगसीने २,८०० एलो रेटिंग गुणांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा विश्वनाथन आनंदच्या नंतरचा तो फक्त दुसरा भारतीय बुद्धिबळपटू होता. त्यानंतर जगज्जेतेपदाची लढत सुरू झाली. आणि तिथेही इतिहास घडला. भारताच्या गुकेशने डिंग लिरेनला ७.५ विरुद्ध ६.५ अशा फरकाने पराभूत केलं. १९ वर्षं आणि १६५ दिवसांचा गुकेश जगातील वयाने सगळ्यात लहान जगज्जेता ठरला आहे. विश्वनाथन आनंद नंतर हा खिताब जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. आनंदने ५ वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे.  (Goodbye 2024)

सुनील छेत्री या भारताच्या सगळ्यात यशस्वी फुटबॉलपटूने २२ वर्षांच्या कारकीर्दीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली. (Goodbye 2024) 
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.