Greg Chappell on Prithvi Shaw : ‘शिस्तीमुळे होणाऱ्या वेदना मागहून पस्तावण्यापेक्षा बऱ्या असतात,’ – ग्रेग चॅपेल

Greg Chappell on Prithvi Shaw : मुंबईकर फलंदाज पृथ्वी शाहला ग्रेग चॅपेल यांनी हा संदेश दिला आहे. 

71
Greg Chappell on Prithvi Shaw : ‘शिस्तीमुळे होणाऱ्या वेदना मागहून पस्तावण्यापेक्षा बऱ्या असतात,’ - ग्रेग चॅपेल
  • ऋजुता लुकतुके

मुंबईचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला अलीकडे मुंबई रणजी संघातून वगळण्यात आलं. पण, ही कारवाई त्याच्यावर त्याच्या वाढलेल्या वजनामुळे करण्यात आली. म्हणजे निवड समितीने त्याला काही दिवसांची मुदत दिली आहे त्याची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी. एक प्रकारे त्याला दिलेला हा इशाराच आहे. एकेकाळी भारतीय संघासाठी दावेदार असलेला पृथ्वी शॉ आता स्थानिक रणजी संघातही बसेनासा झाला आहे आणि अशावेळी भारताचे माजी प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपेल त्याच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि त्यांनी शॉला संदेशही दिला आहे. त्यांनी पृथ्वी शॉला उद्देशून लिहिलेलं एक खुलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. (Greg Chappell on Prithvi Shaw)

(हेही वाचा – PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार)

फक्त २४ वर्षांचा असलेला पृथ्वी शॉला मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक कार्यक्रम आखून दिला आहे आणि त्याचं पालन करून शॉला तंदुरुस्ती कमवायची आहे. या कार्यक्रमाच्या पालनाविषयीही चॅपेल यांनी पत्रात लिहिलं आहे. ‘मी तुला भारताच्या १८ वर्षांखालील संघात खेळताना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तुझ्या कामगिरीने मी अवाक झालो होतो. तेव्हा तू भारतातील सगळ्यात लक्षवेधी युवा खेळाडू होतास. आता तू रणजी संघातही नाहीएस. पण, लक्षात ठेव, कुठल्याही खेळाडूच्या कारकीर्दीत कामगिरीतले उतार चढाव येतच असतात. ते अगदी डॉन ब्रॅडमन आणि मलाही चुकलेले नाहीत. पण, मला असा धक्का बसला तेव्हाच मी माझ्या खेळाकडे गंभीरपणे पाहिलं आणि त्यानंतर माझा खेळ सुधारलाही. (Greg Chappell on Prithvi Shaw)

(हेही वाचा – Imane Khelif : वैद्यकीय अहवाल फुटल्याप्रकरणी इमाने खलीफ करणार कायदेशीर कारवाई)

मी माझा दृष्टिकोन बदलला. खूप पुढचा विचार न करता मी एका वेळी फक्त एका चेंडूचा विचार करायला लागलो आणि नंतर माझी कामगिरी सुधारत गेली. मी ऑस्ट्रेलियन संघातही स्थिर झालो आणि आकडेवारीपेक्षा मी खेळण्याचं तंत्र आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करायला लागतो. तिथे माझी कामगिरी खऱ्या अर्थाने सुधारली,’ असं सुरुवातीला ग्रेग चॅपेल यांनी लिहिलं आहे आणि पुढे ग्रेग चॅपेल लिहितात, ‘आतापर्यंत तू जे केलंस ती तुझी ओळख नसणार आहे. इथून पुढे जे करशील ती तुझी ओळख बनेल. अजून असे अनेक लोक आहेत ज्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. तुला कुठलीही मदत हवी असेल तर मला नि:संकोच संपर्क करू शकतोस.’ (Greg Chappell on Prithvi Shaw)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.