- ऋजुता लुकतुके
आफ्रिकेतील गिनी देशात फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरी दरम्यान चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचं पर्यवसान चेंगराचेंगरीत झालं आणि त्यात चक्क ५६ लोक मरण पावल्याची बातमी आहे. भारतीय वेळेनुसार, सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. यात घातपाताची शक्यता सरकार तपासून पाहत आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, जीव गमावलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. (Guinea Football Accident)
दक्षिण गिनी प्रांतात स्थानिक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना लाबे आणि नेझरकोअर या संघांदरम्यान सुरू होता. लष्करप्रमुक ममाडी दोंबूया यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्या दरम्यान एका संघाला रेफरींनी पेनल्टी बहाल केली. त्यावरून प्रतिस्पर्धी संघ चिडला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चाहत्यांपर्यंत ते लोण पसरलं. त्यांच्यातही हाणामारी सुरू झाली आणि म्हणता म्हणता परिस्थिती चिघळली. (Guinea Football Accident)
(हेही वाचा – Yamunabai Savarkar यांची भगूर येथील सावरकर स्मारकात जयंती साजरी)
At least 56 people were killed and scores injured in a stampede at a soccer stadium in southern Guinea, in West Africa, on Sunday following clashes between fans, the government said#ArianaNews #soccer #stadium #Guinea #Africa #fans pic.twitter.com/vTUntz1wED
— Ariana News (@ArianaNews_) December 2, 2024
आधी प्रेक्षकांमधून दगडफेक सुरू झाली आणि ती थांबवण्यासाठी सुरक्षा जवानांनी अश्रूधुराचा वापर केल्यावर प्रेक्षक बिथरले आणि जागा सोडून धावू लागले. त्यातून चेंगरा चेंगरी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडिओही बाहेर आला आहे. यात रेफरींच्या निर्णयाविरुद्ध चाहते गोंधळ घालताना दिसतात आणि काही चाहते मैदानात घुसलेलेही आपल्याला दिसतात. तिथून पुढे परिस्थिती चिघळलेलीही आपण पाहू शकतो. २०२१ पासून गिनी देशात लष्करी राजवट सुरू आहे. तेव्हाचे अध्यक्ष अल्पा कोंदे यांची लष्कराने हकालपट्टी केली होती आणि सत्ता काबीज केली आहे. (Guinea Football Accident)
माली, नायजर, बुर्किना फासो अशा आजूबाजूच्या देशांमध्येही लष्करी सत्ता लांबली असून पुन्हा लोकशाही प्रस्थापित न झाल्यामुळे लष्करी राजवटीविरुद्ध जनतेतेही असंतोष आहे आणि आंदोलनांच्या रुपात राजवटीला विरोधी होत आहे. त्यामुळे या घटनेकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाईल. (Guinea Football Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community