- ऋजुता लुकतुके
बुद्धिबळाच्या ताज्या जागतिक क्रमवारीत डी गुकेशने आठवा क्रमांक पटकावला आहे. हे त्याचं सर्वोत्तम मानांकन आहेच. शिवाय विश्वनाथन आनंदची ३७ वर्षांची सद्दी मोडून गुकेश आता अग्रमानांकीत बुद्धिबळपटू बनला आहे. अलीकडे झालेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने उपविजेतेपद पटकावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचवेळी १७ वर्षांचा डी गुकेशही आपल्या कामगिरीने नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. त्यामुळे एकूणच बुद्धिबळ विश्वात भारतीय युवा खेळाडू आपला दबदबा निर्माण करत आहेत. प्रज्ञानंद नंतर आणखी एक भारतीय डी गुकेशने ताज्या क्रमवारीत ८ वा क्रमांक पटकावला आहे.
आताच्या घडीला गुकेश भारताचा अग्रमानांकीत बुद्धिबळपटू बनला आहे. आणि तसं करताना विश्वनाथन आनंद या भारताच्या ज्येष्ठ खेळाडूला गुकेशने मागे टाकलं आहे. १९८६ पासून म्हणजे मागची ३७ वर्षं विश्वनाथन आनंद भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होता. विशेष म्हणजे गुकेशने १७ व्या वर्षीच ही कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन अर्थात फिडेच्या क्रमवारीत डी गुकेश आठव्या तर पाच वेळा जगज्जेता ठरलेला विशी आनंद नवव्या स्थानावर आहेत. हे दोन भारतीय पहिल्या दहात आहेत.
It’s official! Gukesh is India’s #1 in the #FIDErating list!
🔥 The 17-year-old prodigy makes history by overtaking the five-time World Champion Vishy Anand and terminating his uninterrupted 37-year reign as India’s top-rated player!
📷 Stev Bonhage pic.twitter.com/paDli9hslX
— International Chess Federation (@FIDE_chess) September 1, 2023
१ सप्टेंबरपासून क्रमवारीतीत बदल लागू झाले आहेत. यात गुकेशच्या खात्यात आता २७५८ गुण आहेत. तर आनंदच्या खात्यात २७५४ गुण आहेत. बुद्धिबळातले गुण हे रेटिंग गुण असतात. आणि तुमच्या कामगिरीची सरासरी यात काढली जाते. इतर खेळांसारखे प्रत्येक विजय किंवा स्पर्धेतील क्रमवारीनुसार तुम्हाला गुण मिळत नाहीत. त्यामुळे बुद्धिबळात चार गुणांचा फरक खूप जास्त आहे. या रेटिंग प्रणालीला एलो रेटिंग असं म्हटलं जातं.
(हेही वाचा – Aditya L1 : ‘आदित्य एल-1’ प्रक्षेपणासाठी तयार; ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहता येणार)
प्रग्यानंद तिसरा अव्वल भारतीय
ताज्या क्रमवारीनुसार, पाच भारतीय बुद्धिबळपटू पहिल्या तीसात आहेत, ही देखील भारतासाठी जमेची बाजू आहे. गुकेश आणि आनंद नंतर तिसरा क्रमांक विश्वचषकात उपविजेतेपद पटकावलेल्या प्रज्ञानंदचा लागतो. त्याच्या खात्यात २७२७ गुण जमा आहेत. आणि क्रमवारीत त्याचं स्थान आहे १९वं. तर विदित गुजराथी (२७), अर्जुन एरिगसी (२८) आणि अनुभवी पी हरिकृष्णा (३१) क्रमांकावर आहेत.
गुकेश बुद्धिबळात विश्वनाथन आनंदला आपला आदर्श मानतो. त्यामुळे आनंदला मागे टाकल्याचा आनंद त्याला आहेच. शिवाय येणाऱ्या कालात आशियाई क्रीडास्पर्धांबरोबरच कँडिडेट कप आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धा त्याला खुणावतायत. अझरबैजानमध्ये बाकू इथं विश्वचषक स्पर्धेदरम्यानच गुकेशने आनंदला मागे टाकलं होतं. दुसऱ्या फेरीतील त्याच्या विजयामुळे त्याचे एलो रेटिंग वाढणार हे निश्चित होतं. पण, अधिकृतपणे १ सप्टेंबरला फिडेनी तशी घोषणा केली आहे. आणि गुकेशविषयीचा अंदाज अचूक ठरला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community