- ऋजुता लुकतुके
नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेपूर्वी भारताचा डी गुकेश जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर होता. आणि अर्जुन एरिगसी चौथ्या. गुकेश भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. पण, स्पर्धेत एरिगसीला पहिल्या ४ पैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. तर गुकेश स्थिर खेळ करत स्पर्धेत दुसरं स्थान राखून आहे. त्यामुळे गुकेशने आता अर्जुन एरिगसीला मागे टाकलं आहे. आतापर्यंत स्पर्धेत ५ डाव झाले आहेत. पण, अर्जुनने एकही सामना जिंकलेला नाही. (Gukesh India No One)
(हेही वाचा – Mumbai Fire: गोरेगावच्या फर्निचर मार्केटला भीषण आग ; 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल)
तर गुकेशने आतापर्यंत अनिश गिरी आणि केमर यांच्याविरोधात विजय मिळवला आहे. तर कारूआना, फेडोसीव्ह आणि सराना यांच्याबरोबकचे सामने बरोबरीत सोडवले आहेत. त्यामुळे त्याचे साडेतीन गुण झाले आहेत. स्पर्धेत प्रग्यानंदा आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात सिंगापूर इथं डिंग लिरेनला हरवून गुकेशने जगज्जेतेपद पटकावलं आहे आणि तेव्हापासून तो अपराजित आहे. अर्जुनने टाटा स्टील स्पर्धा खेळताना २,८०१ गुणांवर सुरुवात केली होती. पण, लागोपाठच्या पराभवामुळे २१.५ गुणांची घसरण होऊन तो २,७७९.५ एलो गुणांवर पोहोचला आहे. (Gukesh India No One)
(हेही वाचा – ICC Test Team of the Year : आयसीसीच्या २०२४ च्या सर्वोत्तम खेळाडूंच्या कसोटी संघात तिघे भारतीय)
तर गुकेश आता २,७८४ गुणांवर पोहोचला आहे. म्हणजेच तो भारताचा अव्वल खेळाडू आता गुकेश आहे. टाटा स्टील स्पर्धा संपेल तेव्हा फिडेच्या क्रमवारीत अधिकृत बदल होतील. स्पर्धेच्या पाच फेऱ्या अजून बाकी आहेत आणि क्रमवारीत आणखी बदलही होऊ शकतात. अर्जुन एरिगसी हा भारताचा २,८०० एलो रेटिंग गुण पार करणारा आनंद नंतरचा दुसरा बुद्धिबळपटू होता. हा लौकिक टाटा स्टील स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर त्याने गमावला आहे. (Gukesh India No One)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community