-
ऋजुता लुकतुके
बुद्धिबळातील तरुण आणि नवा जगज्जेता डी गुकेशचं चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर अगदी जोरदार स्वागत झालं. अख्खी चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचाईजी आणि खेळाडू त्याच्यासाठी मैदानावर हजर होते. १८ वर्षीय गुकेश सर्व खेळाडूंना भेटला. विशेष म्हणजे रवीचंद्रन अश्विन या फिरकीचे डाव टाकणाऱ्या खेळाडूबरोबर गुकेशने पटावर दोन हात केले. अर्थात, हा मैत्रीपूर्ण सामना होता आणि दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. (Gukesh Vs Ashwin Chess)
आधी अश्विनने गुकेशला चेन्नई सुपरकिंग्जची जर्सी दिली. मैदानावर फलंदाजांना फिरकीच्या पेचात पकडण्यासाठी अश्विन ओळखला जातो. त्याचा मुकाबला इथं पटावर धोरणी चाली रचणाऱ्या गुकेशशी होता. (Gukesh Vs Ashwin Chess)
(हेही वाचा – MVA मध्ये शिवसेना उबाठा एकाकी!)
World champion of chess! ♟️
A Chennai paiyan at heart! 💛
A sparring with Ashwin! 🦁🤝Introducing Chennai Superstars! Get set to meet Gukesh and his love for the city!🥳🤝
Coming Soon! 📹🔜#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/bwVRm4zSDn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2025
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात डी गुकेश चीनच्या डिंग लिरेनला हरवून नवीन जगज्जेता बनला आहे. या प्रयत्नांत गुकेश विश्वनाथन आनंद नंतरचा फक्त दुसरा भारतीय जगज्जेता बनला आहे. महत्त्वाचं म्हणजे गॅरी कॉस्परोव्ह सारख्या दिग्गजाचा सर्वात लहान वयात जगज्जेता होण्याचा विक्रम गुकेशने मोडला. कॅस्परोव्ह ३२ व्या वर्षी जगज्जेता बनला होता. सध्या गुकेश जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅग्नस कार्लसन आणि हिकारू नाकामुरा हे खेळाडू त्याच्या पुढे आहेत. (Gukesh Vs Ashwin Chess)
महत्त्वाच्या स्पर्धा खेळून गुकेश भारतात परतला आहे आणि अलीकडेच त्याने चेन्नईत तिरुमाला मंदिराला आपल्या कुटुंबीयांसमवेत भेट दिली. तिथे त्याच्या कुटुंबाने काही धार्मिक विधी केले आणि त्यानंतर तो चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या भेटीला आला. २०२५ मध्ये गुकेशने पारंपरिक बुद्धिबळाबरोबरच जलगगती आणि अतीजलद खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. (Gukesh Vs Ashwin Chess)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community