-
ऋजुता लुकतुके
अमेरिकेत सुरु असलेल्या टेन २०२५ ॲथलेटिक्स मीटमध्ये १०,००० मीटर पळण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगने (Gulveer Singh) नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. २६ वर्षीय गुलवीरने १०,००० मीटरचं अंतर २७:००:२२ मिनिटांत पार केलं. चुरशीच्या झालेल्या या लढतीत गुलवीर सहावा आला. इस्माईल किपकुरुईने २६:५०:२१ मिनिटांत अंतर पूर्ण करत सुवर्ण पटकावलं. तर हॅबटोल सॅम्युअल आणि ॲडरियन वाईल्टशट हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले.
गुलवीर सिंगने (Gulveer Singh) वैयक्तिक कामगिरीत चांगली सुधारणा करताना जपानमध्ये २०२४ साली झालेल्या स्पर्धेतील २७:१४:८८ ही आपली वैयक्तिक कामगिरी १४ सेकांदांनी सुधारली. नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली असली तरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील गुलवीरचा प्रवेश थोडक्यात हुकला आहे. त्यासाठी त्याला ००:२२ सेकंदं कमी पडले.
(हेही वाचा – IPL 2025, MI vs KKR : ‘रोहित शर्माच्या हातातून वेळ निसटत चालली आहे,’ – संजय मांजरेकर)
India’s Gulveer Singh on his way to national 10,000m track record on Saturday night in USA. He finished 6th with a time of 27:00.22 to better his own nat record of 27:14.88. pic.twitter.com/0HxJVKZPSi
— Athletics Federation of India (@afiindia) March 30, 2025
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील प्रवेश हुकला असला तरी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याला खेळता येणार आहे. कारण, या स्पर्धेतील पात्रता निकष २९:३३:26 मिनिटांचा होता. शिवाय कोरियातील गामी इथं होणाऱ्या आंतरखंडीय स्पर्धेसाठीही त्याची निवड होऊ शकते. भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने परवानगी दिल्यास तो या स्पर्धेत खेळू शकतो.
गुलवीरच्या (Gulveer Singh) नवीन विक्रमामुळे आशियाई स्तरावर १०,००० मीटर स्पर्धेत तो तिसरा सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे. कतारच्या अहमद हसन अब्दुल्ला आणि निकोलस केंबोई हे दोनच खेळाडू आशियात त्याच्या पुढे आहेत. गेल्यावर्षी त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला तेव्हा गुलवीरचं कौतुक झालं होतं. कारण, २००८ मध्ये १६ वर्षांपूर्वी सुरेंद्र सिंगने रचलेला विक्रम त्याने मोडला होता. २०२३ च्या होआंगझाओ आशियाई क्रीडास्पर्धेत गुलवीरला १०,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक मिळालं होतं. भारतात ५००० आणि १००० मीटर शर्यतीतही राष्ट्रीय विक्रम गुलवीरच्याच नावावर आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community