Happy Birthday MS Dhoni : धोनीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे ‘५ रेकाॅर्ड्स’

233

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याचा ७ जुलैला (गुरुवारी) ४१ वा वाढदिवस आहे. रांची येथे जन्मलेल्या या अष्टपैलू क्रिकेटपटूने आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला. भारतीय संघात सहभागी झाल्यानंतर, धोनी टीम इंडियाचा पोस्टर बाॅय बनला. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीने केवळ भारताला सर्वोच्च स्थानावर नेले नाही, तर स्वत:ला ही जगातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान कमावले. धोनीला (Mahi) जगातील सर्वोत्कृष्ट मॅच फिनीशर म्हणूनही ओळखलं जातं. (Match Finisher)

माही म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीला Captain cool म्हणून ओळखलं जातं. दडपणाच्या परिस्थितीत शांत राहून आपल्या संघासाठी योग्य तो निर्णय घेऊन, संघाला विजय मिळवून देण्याची कला फक्त धोनीकडे आहे. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या नावावर असणारे पाच Unbreakable रेकाॅर्ड्स जाणून घेऊया.

( हेही वाचा: फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद नव्हे; तर भारतातल्या ‘या’ शहरांचीही बदलण्यात आली नावे )

धोनीचे पाच रेकाॅर्ड्स

सर्वात वेगवाग प्रथम क्रमांकावर पोहोचणारा फलंदाज

वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध निराशाजनक पदार्पण करणा-या MS Dhoni याने पाकिस्तानविरुद्ध काही स्फोटक खेळी खेळल्या आणि टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित केले. ICCच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत धोनी अत्यंत वेगाने क्रमांक-१ वर पोहोचणारा फलंदाज ठरला. त्याने केवळ ४२ सामने खेळून अव्वल स्थान मिळवले होते. हा पराक्रम करणारा धोनी सर्वात वेगवान खेळाडू ठरला.

षटकासह मॅच संपवणारा एकमेव खेळाडू

महेंद्रसिंग धोनी हा मोठे- मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्याने वेळोवेळी हे सिद्ध देखील केले आहे आणि एक अनोखा विक्रमदेखील नोंदवला आहे. धोनी जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने ९ सामन्यांत षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.

सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा

महेंद्रसिंग धोनी याने बहुतेक वेळा सहाव्या क्रमांकावर फलदांजी केली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने १२५ डावांमध्ये ४६.७९ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या. जो एक विक्रम आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर येऊन फलदांजी करताना, यापेक्षा जास्त धावा अन्य कोणत्याही खेळाडूने केल्या नाहीत.

७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतक

महेंद्रसिंग धोनी याने सातव्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. धोनीने ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना २ शतके ठोकली आहेत. दुस-या कोणत्याही खेळाडूला ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन शतके ठोकता आलेली नाहीत.

वनडे सामन्यात सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम

सामन्यात शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय कसा मिळवून देता येईल, हे धोनीला चांगलेच माहित होते. त्यामुळेच त्याच्या नावावर सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रम आहे. तो तब्बल ७८ एकदिवसीय सामन्यात नाबाद राहून खेळला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.