Harbhajan Apologizes : दिव्यांगांची नक्कल करणाऱ्या व्हिडिओवरून युवराज, हरभजन आणि रैनाविरुद्ध पोलीस तक्रार

Harbhajan Apologizes : व्हायरल व्हिडिओवर माफी मागत हरभजनने तो डिलिट केला आहे. 

142
Harbhajan Apologizes : दिव्यांगांची नक्कल करणाऱ्या व्हिडिओवरून युवराज, हरभजन आणि रैनाविरुद्ध पोलीस तक्रार
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या चॅम्पियन संधाने लिजंड्स चषकात मिळवलेल्या विजयानंतर युवराज सिंग, हरभजन आणि सुरेश रैना यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. १५ दिवसांत अख्खी स्पर्धा खेळल्यामुळे शरीराची अवस्था ‘तौबा, तौबा’ अशी झाली असल्याचं या व्हिडिओत त्यांनी म्हटलं होतं. पण, या व्हिडिओत दिव्यांगांची नक्कल करताना दिसतात आणि हे असंवेदनशील आहे, अशी टीकाही खेळाडूंवर झाली. तिन्ही खेळाडूंविरुद्ध पोलीस तक्रारही झाली. त्यानंतर हरभजन सिंगने एक पत्रक जारी करून बिनशर्त माफी मागितली आहे आणि तो व्हिडिओही सोशल मीडियावरून काढून टाकला आहे. (Harbhajan Apologizes)

दिव्यांगांना रोजगार मिळावा म्हणून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अरमान अली यांनी या तिघांविरुद्ध पोलीस तक्रार केली होती. त्यानंतर हरभजनने ट्विटच्या माध्यमातून माफी मागितली आहे. (Harbhajan Apologizes)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकिस्तानला भारताकडून हवा केंद्राने परवानगी नाकारल्याचा पुरावा)

‘१५ दिवसांत इतके सामने खेळून शरीराची तौबा, तौबा अवस्था झाली आहे,’ असा त्या व्हिडीओचा आशय होता. पण, ते करताना दिव्यांगांची झालेली नक्कल असंवेदनशील असल्याची टीका झाली होती. पॅरालिम्पिक खेळाडू मानसी जोशीनेही त्यावर जाहीरपणे टीका केली होती. हरभजन आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणतो, ‘आमच्या एका व्हिडिओमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे मला समजलं. मी इथं नमूद करू इच्छितो की, कुणाला दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. आमच्या शरीराची काय अवस्था झालीय एवढंच आम्हाला विनोदी पद्धतीने दाखवायचं होतं.’ हा मुद्दा इथेच संपवून सगळे परत गुण्या गोविंदाने राहूया, असंही हरभजनने शेवटी म्हटलं आहे. (Harbhajan Apologizes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.