IPL 2025, Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नावावर आयपीएलमध्ये अनोखा विक्रम

नेतृत्व करताना डावांत ५ बळी घेणारा तो पहिला खेळाडू आहे.

65
IPL 2025, Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नावावर आयपीएलमध्ये अनोखा विक्रम
IPL 2025, Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नावावर आयपीएलमध्ये अनोखा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) लखनौविरुद्धचा (LSG) सामना गमावला असला तरी या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) डावांत ५ बळी मिळवले. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील (IPL 2025) एकमेव कर्णधार आहे. त्याने लखनौविरुद्ध फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर निकराने गोलंदाजी करताना हार्दिकने पंजाबचे सलामीवीर एडन मार्करम (Aiden Markram) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी लखनौ संघाला ७३ धावांची मजबूत भागिदारी करून दिलेली असताना, त्यांची मधली फळी कापून काढण्याची कामगिरी हार्दिकने केली. निकोलस पुरन (१२), ऋषभ पंत (२), एडन मार्करन (५३), आणि त्यानंतर डेव्हिड मिलर (३०) आणि आकाशदीप (Akash Deep) यांनाही झटपट बाद केलं.

(हेही वाचा – Cipla Share Price : सिपला कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसांत ५ टक्क्यांची घसरण का झाली?)

हार्दिकने वेळोवेळी धावसंख्येला खिळ घातल्यामुळेच लखनौ सुपर जायंट्स संघाला २०३ धावांत रोखणं मुंबईला शक्य झालं. कारण, खेळपट्टी फलंदाजीला पोषक दिसत होती. आणि अशावेळी पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं होतं. पण, फलंदाजीला खिळ घालण्याचं काम हार्दिकने (Hardik Pandya) केलं. लखनौच्या एकाना स्टेडिअमवर आतापर्यंत फक्त दुसऱ्यांदा २०० धावांचा आकडा पार झाला. यापूर्वी कोलकाता संघाने लखनौविरुद्ध द्विशतकी मजल मारली होती.

(हेही वाचा – IPL 2025, MI vs LSG : लखनऊ विरुद्ध रोहित शर्मा का खेळणार नाही?)

कर्णधार असताना मिळवलेले सर्वाधिक बळी (आयपीएल)
  • ५७ – शेन वॉर्न
  • ३० – हार्दिक पंड्या
  • ३० – अनिल कुंबळे
  • २५ – रविचंद्रन अश्विन
  • २१ – पॅट कमिन्स

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल आहे. तसंच आयपीएलमध्ये (IPL 2025) कर्णधार म्हणून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाच्या यादीतही तो आता ३० बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. इथं पहिल्या स्थानावर आहे शेन वॉर्न. त्याने कर्णधार असताना ५७ बळी घेतले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.