- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीकडे परतल्यानंतर हार्दिक पांड्याचे ग्रह (Hardik Pandya Frustrated) सध्या फिरलेले आहेत. एकतर रोहितला काढून हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याचा फ्रँचाईजीचा निर्णय अनेकांना रुचलेला नाही. त्यातच मैदानावर संघाला एकामागून एक पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. पराभवच नाही, तर मुंबईचा संघ पहिल्या दोन सामन्यांसाठी अहमदाबाद आणि हैद्राबादला गेला होता. तिक़डच्या दोन्ही मैदानांवर प्रेक्षकांनी हार्दिकची हुर्यो उडवली. (Hardik Pandya Frustrated)
(हेही वाचा- Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस)
‘रोहीत, रोहीत’ अशा घोषणा चाहते देताना दिसले. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा पराभव जास्त झोंबणारा होता. त्या सामन्यानंतर संघाचे मालक आकाश अंबानी (Akash Ambani), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) एकमेकांशी गंभीरपणे चर्चा करतानाही दिसले. तेव्हाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि त्यातील हार्दिकची एक प्रतिक्रिया लक्ष वेधून घेतेय. आकाश अंबानींचा चेहरा बऱ्यापैकी वैतागलेला आहे. आणि संभाषणात तेच बोलताना दिसतात. हार्दिक आणि रोहित त्यांचं ऐकून घेतायत. आणि हे संभाषण संपल्यावर हार्दिक तडक उठून ड्रेसिंग रुमकडे चालताना दिसतो. (Hardik Pandya Frustrated)
पण, तो ही चिडलाय. आणि जाताना प्रेक्षकांची रोहित, रोहित अशी नारेबाजी सुरूच असताना हार्दिक वैतागून गॅलरीच्या कडेला असलेल्या जाळीवर डोकं आपटून घेताना दिसतो. (Hardik Pandya Frustrated)
What a speed Pandya 👏🏻 Faster than the blink 😂 #RohitSharma𓃵 pic.twitter.com/G83ZjalBvx
— Snigdha Sharma (@whySnigdha) March 28, 2024
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?)
फक्त प्रेक्षकच नाही तर माजी खेळाडूही हार्दिक पांड्याच्या काही निर्णयांवर टीका करताना दिसले आहेत. संघ प्रशासन अर्थातच हार्दिकच्या पाठीशी आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने हार्दिकला मोलाचा सल्ला दिला आहे. ‘नकारात्मक प्रतिसाद आणि उडवलेली हुर्यो ब्लॉक करून टाक. ती आतमध्ये झिरपू देऊ नको. वेळ गेला की, सगळं ठिक होईल,’ असं स्मिथने म्हटलं आहे. (Hardik Pandya Frustrated)
(हेही वाचा- Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच)
स्वत: स्टीव स्मिथ (Steve Smith) वर २०१८ मध्ये चेंडू कुरतडल्याचा आरोप झाला होता. आणि त्यावेळी झालेल्या टिकेतून सावरण्यासाठी स्मिथलाही वेळ लागला होता. त्यामुळे आपल्या अनुभवातून त्याने हार्दिकला हा सल्ला दिला आहे. टिकेकडे लक्ष न देता, मैदानातील कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं, असंच स्मिथचं सांगणं आहे. (Hardik Pandya Frustrated)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community