Hardik Pandya : आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळांडूंमध्ये अव्वल 

Hardik Pandya : टी-२० विश्वचषकात १०० धावा आणि १० बळी एकत्र मिळवणारा हार्दिक पहिला अष्टपैलू खेळाडू आहे 

156
Hardik Pandya : आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळांडूंमध्ये अव्वल 
Hardik Pandya : आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळांडूंमध्ये अव्वल 
  • ऋजुता लुकतुके 

नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषकातील चांगल्या कामगिरीनंतर भारताचा टी-२० संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दोन स्थानांनी वर जाऊन श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाच्या (Wanindu Hasaranga) बरोबर अव्वल स्थानावर पोहोचला आहे. अंतिम सामन्यातही त्याने हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) आणि डेव्हिड मिलर (David Miller) या जम बसलेल्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी बाद केलं.

(हेही वाचा- Vasant More उद्धव ठाकरेंना साथ देणार? ‘मातोश्री ‘ वर भेट घेणार!)

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कसोटी प्रकारात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिला आला होता. हार्दिक पांड्याने संपूर्ण टी-२० स्पर्धेत १५० पेक्षा जास्त स्ट्राईकरेटने १४४ धावा केल्या. तर ११ बळी मिळवले.  (Hardik Pandya)

 अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला अंतिम षटकात १६ धावा हव्या होत्या. पण, पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरचा सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) झेल पकडला आणि सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. हार्दिकने या षटकात फक्त ८ धावा दिल्या. एकूण सामन्यात त्याने ३ बळी मिळवले. (Hardik Pandya)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : पीसीबीने जाहीर केलं चॅम्पियन्स करंडकाचं वेळापत्रक, भारत वि पाक सामना १ मार्चला प्रस्तावित)

मार्कस स्टॉईनिस (Marcus Stoinis), सिकंदर रझा (Sikandar Raza), शकीब अल हसन (Shakib Al Hasan) आणि लियम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) हे खेळाडूही एकेक शिडी वर चढले आहेत. तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (Mohammad Nabi) चार स्थानांनी खाली घसरून पहिल्या पाचातून बाहेर गेला आहे. गोलंदाजांच्या यादीत आदील रशिद पहिल्या क्रमांकावर आहे.अक्षर पटेल (Axar Patel) (७) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) (९) हे इतर दोन गोलंदाज पहिल्या दहांत आहेत. फलंदाजीत सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) ट्रेव्हिस हेडने मागे टाकलं आहे. सूर्यकुमार दुसऱ्या तर यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal) सातव्या क्रमांकावर आहे. (Hardik Pandya)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.