- ऋजुता लुकतुके
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टी-२० प्रकारात भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतीय संघाने ३-१ ने जिंकली. या मालिकेत चमकलेले तिलक वर्मा, संजू सॅमसन यांनी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी मुसंडी मारली आहे. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आता टी-२० प्रकारात अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल ठरला आहे. तर तिलक वर्माने आफ्रिकेत लागोपाठ दोन शतकं झळकावली. शिवाय ४ सामन्यांच्या मालिकेत २८० धावाही केल्या. तो आता ६९ जागांची उसळी घेऊन थेट पहिल्या दहांत पोहोचला आहे.
Stellar ODI and T20I performances bring significant shifts in the latest ICC Men’s Rankings 🏏
🔗: https://t.co/jV3KPjAGsD pic.twitter.com/C0vgrrx2Rq
— ICC (@ICC) November 20, 2024
(हेही वाचा – Jammu and Kashmir मध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएची ८ ठिकाणी छापेमारी!)
तिलक वर्मा आपल्या कामगिरीने या मालिकेत मालिकावीर ठरला होता. आता टी-२० क्रमवारीतील तो भारताचा अव्वल फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादव आता चौथ्या तर तिलक वर्मा थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ५ सामन्यांमध्ये ३ शतकांसह संजू सॅमसनही २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आफ्रिकेचा ट्रिस्टियन स्टब्ज २३ व्या तर हेन्रिक क्लासेन ५९ व्या क्रमांकावर आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या क्रमवारीत एकमेव भारतीय तेज गोलंदाज पहिल्या दहांत आहे तो म्हणजे अर्शदीप सिंग. तो नवव्या क्रमांकावर आहे. तर आठव्या क्रमांकावर रवी बिश्नोई कायम आहे. (Hardik Pandya)
(हेही वाचा – Vasai-Virar महापालिका क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा जास्त असूनही पाणीटंचाई का?; आरटीआयच्या माहितीमुळे निर्माण होतोय प्रश्न)
ऑस्ट्रेलियाचे ॲडम झंपा आणि नॅथन एलीस यांनी आपली आगेकूच या आठवड्यातही कायम ठेवली आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करून श्रीलंकन गोलंदाजही या यादीत पुढे सरकले आहेत. वानिंदू हसरंगा तर आपलं दुसरं स्थान भक्कम करून आहे. इंग्लंडचा आदील रशिद या यादीत सध्या अव्वल आहे. पण, त्याच्या आणि हसरंगाच्या गुणांमध्ये फक्त ५ गुणांचा फरक आहे. कुशाल मेंडिस आणि महिष थिक्षणा यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत आगेकूच सुरू ठेवली आहे. (Hardik Pandya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community