भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्याचा घोटा दुखावला असून त्याने आपले षटक पूर्ण न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पांड्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.आता बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आहे. त्याच्या दुखऱ्या घोट्याचे स्कॅन होणार आहे. (INDIA VS BANGLADESH)
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखबीबीसीआयने हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.ल करण्यात आले आहे. स्कॅनिंग केल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबतची माहिती समोर येणार आहे.
🚨 Update 🚨
Hardik Pandya’s injury is being assessed at the moment and he is being taken for scans.
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/wuKl75S1Lu
— BCCI (@BCCI) October 19, 2023
हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडिया संतुलीत होत होती. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत मोलाचं योगदान देतो. अशात त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची अडचण वाढणार आहे. (INDIA VS BANGLADESH).
(हेही वाचा :Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनकर्त्याची मुंबईत आत्महत्या)
दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्या आज मैदानात पुन्हा दिसणार नाही. हार्दिक पांड्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिथे हार्दिक पांड्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या पुढील सामन्याआधी तंदुरुस्त होणार का? हा प्रश्नही चाहत्यांना सतावत आहे.
दुखापत कशी झाली ?
आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमारह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नव्हते. नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. पहिला चेंडू निर्धाव फेकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण त्याचवेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले. हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गेला. पण त्याची वेदना वाढली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याच्या षटकातील तीन चेंडू टाकण्यासाठी विराट कोहली आला. विराट कोहलीने सहा वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. विराट कोहलीने तीन चेंडूमध्ये दोन धावा दिल्या.
Join Our WhatsApp Community