Hardik Pandya Injury Update : हार्दिक इंग्लंड विरुद्ध तरी खेळेल का? संघाकडून मोठा अपडेट

अष्टपैलू हार्दिक पांड्या पायाच्या दुखापतीतून सावरला आहे का, इंग्लंड विरुद्ध तो खेळू शकेल का यावर संघ प्रशासनाने काय म्हटलंय पाहूया…

210
Hardik Pandya Injury Update : हार्दिक इंग्लंड विरुद्ध तरी खेळेल का? संघाकडून मोठा अपडेट
Hardik Pandya Injury Update : हार्दिक इंग्लंड विरुद्ध तरी खेळेल का? संघाकडून मोठा अपडेट
  • ऋजुता लुकतुके

अष्टपैलू हार्दिक पांड्या पायाच्या दुखापतीतून सावरला आहे का, इंग्लंड विरुद्ध तो खेळू शकेल का यावर संघ प्रशासनाने काय म्हटलंय पाहूया… (Hardik Pandya Injury Update)

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला हार्दिक पांड्याची फारशी उणीव भासली नाही. पण, तो संघात असेल तर एकतर फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत झिरपते आणि संघाला सहाव्या गोलंदाजाची उणीवही भासत नाही. त्यामुळे हार्दिक सारखा अष्टपैलू संघात असल्याचं महत्त्व भारतीय संघ प्रशासनाला नक्कीच ठाऊक आहे. पण, बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिकचा डावा पाय दुखावलाय आणि सध्या तो बंगळुरूच्या क्रिकेट अकॅडमीत उपचार घेतोय. (Hardik Pandya Injury Update)

आणि त्याचे ताजे स्कॅन अहवाल पाहता तो पुढील दोन सामने खेळण्याची शक्यता कमीच असल्याचं संघ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं क्रिकेट अकॅडमीतील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. हार्दिकच्या दुखापतीची बातमी देताना बीसीसीआयने हार्दिक भारतीय संघालाल थेट लखनौमध्ये भेटेल असं म्हटलं होतं. (Hardik Pandya Injury Update)

पण, तशी परिस्थिती सध्या दिसत नाहीए. हार्दिक अजूनही बंगळुरूमध्येच आहे आणि त्याचे ताजे स्कॅन अहवालही फारसे चांगले नसल्याचं पीटीआयने बातमीत म्हटलं आहे. त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला अजून सूज आहे. ‘हार्दिक अजूनही औषधोपचार घेत आहे. त्याच्या पायाची सूज बऱ्यापैकी गेली असली तर पूर्णपणे गेलेली नाही आणि या आठवड्याच्या शेवटीच तो पुन्हा गोलंदाजी करायला लागेल,’ असं क्रिकेट अकॅडमीतील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (Hardik Pandya Injury Update)

(हेही वाचा – Reservation : आरक्षण हे आर्थिक निकषांवर आधारित हवे; विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल)

याचाच अर्थ तो २९ तारखेला इंग्लंड विरुद्ध आणि २ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्‌धही खेळण्याची संधी कमीच आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामी यांना संघात कायम ठेवू शकतो. कारण, शामीने ५ बळी मिळवत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. तर सुर्यकुमार दुर्दैवाने २ धावांवरच धावचीत झाला असला तरी मधल्या फळीत तो चांगली कामगिरी बजावू शकतो. (Hardik Pandya Injury Update)

माजी पाक खेळाडू वसिम अक्रमनेही हार्दिकची अनुपस्थिती ही भारतासाठी चांगलीच ठरेल असं मत व्यक्त केलं आहे. त्याच्यामते त्यामुळे संघात दोन तज्ञ खेळाडू खेळतील आणि त्यामुळे संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीतील खोली आणखी वाढेल. अर्थात, हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधारही आहे आणि तो वेळेवर संघात परतणं आणि पुन्हा तंदुरुस्त होणं ही संघाची प्राथमिकता आहे. (Hardik Pandya Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.