Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा झटका; हार्दिक पंड्या विश्वचषकातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

149
Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा झटका; हार्दिक पंड्या विश्वचषकातून बाहेर, 'या' खेळाडूला मिळणार संधी

क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू (Hardik Pandya) हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरू न शकल्यामुळे आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या उर्वरित सामन्यातून तो बाहेर पडला आहे. त्यामुळे रोहितच्या ब्ल्यू आर्मीला मोठा झटका बसला आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आता हार्दिकच्या (Hardik Pandya) जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले असून तो रविवार, ५ नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे.

(हेही वाचा – Onion Prices : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी वर्गाची चिंता वाढली)

गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. भारताचा (Hardik Pandya) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्याचा घोटा दुखावला असून तो आपले षटक पूर्ण न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

या दुखापतीमुळे हार्दिकला (Hardik Pandya) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता सर्व क्रिकेट प्रेमींना पंड्या पुढील सामन्यांत खेळणार की नाही असा प्रश्न पडलेला असतांनाच तो या वर्ल्डकपच्या उर्वरित सामन्यांमधून खेळू शकणार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.