World Cup 2023 : हार्दिक पंड्या च्या ‘त्या मंत्र वाल्या’ चेंडूच्या मागचे सत्य त्यानेच सांगितले जाणुन घ्या काय आहे..

सोशल मीडिया यूजर्स आणि क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे की हार्दिकने अशी काय जादू केली की त्याला लगेच विकेट मिळाली.

115
World Cup 2023 : हार्दिक पंड्या च्या 'त्या मंत्र वाल्या' चेंडूच्या मागचे सत्य त्यानेच सांगितले जाणुन घ्या काय आहे..
World Cup 2023 : हार्दिक पंड्या च्या 'त्या मंत्र वाल्या' चेंडूच्या मागचे सत्य त्यानेच सांगितले जाणुन घ्या काय आहे..

विश्वचषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र हार्दिक पंड्याच्या त्या मंत्रवाल्या बॉलची आणि त्यानंतर लगेचच घेण्यात आलेली विकेट ही खूप चर्चेची ठरली होती. सोशल मीडिया ने या व्हिडीओ वर चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र यामागचे सत्य त्यांनी सांगितले आहे. (World Cup 2023 )

भारताने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. आधी गोलंदाजांनी एकहाती कामगिरी आणि नंतर रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला आठव्यांदा विश्वचषकात पराभूत केले. या सामन्यात हार्दिक पांड्यानेही दोन विकेट्स घेतल्या, पण हार्दिकने तो विकेट बॉल फेकण्यापूर्वी कोणता ‘मंत्र’ जपला होता हे सांगितले आहे. सोशल मीडिया यूजर्स आणि क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे की हार्दिकने अशी काय जादू केली की त्याला लगेच विकेट मिळाली. (World Cup 2023 )
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात दमदार होती. मोहम्मद सिराजने मागील सामन्यातील शतकवीर शफीकला एलबीडब्ल्यू करत संघाला पहिले यश मिळवून दिले. बॉलिंग चेंज म्हणून आलेल्या हार्दिक पंड्याने बॉल फेकण्यापूर्वी बॉल हातात घेतला आणि बॉल दोन हातात धरून काहीतरी तो मंत्र पुटपुटला. याच चेंडूवर इमाम-उल-हक हा हार्दिकचा बळी ठरला आणि यष्टिरक्षक राहुलकडून झेलबाद झाला. सर्वांना आश्चर्य वाटले की, हार्दिकने नेमके काय केले?

(हेही वाचा : Navaratri 2023 : नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी पर्यंत बेस्ट च्या २६ जादा बसेस)

या सामन्यात पाकिस्तानी संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यानंतर इमाम आणि अब्दुल्ला शफीक या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. शफीक बाद झाल्यानंतर इमामने धावा काढण्याचा वेग कायम ठेवला आणि खराब चेंडूंवर चौकार मारण्याची संधी वाया घालवली नाही. दरम्यान, हार्दिक पांड्या डावातील १३वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा इमामने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर शानदार चौकार मारला. यानंतर हार्दिक पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी चेंडूसोबत काहीतरी बोलल्याचे किंवा मंत्र पुटपुटल्याचे दिसत होते आणि पुढच्याच तिसऱ्या चेंडूवर त्याने इमामला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हार्दिकने सत्य सांगितले

या सामन्यानंतर गौतम गंभीर आणि इरफान पठाण पोस्ट मॅचमध्ये हार्दिक पांड्याशी बोलत असताना त्यांनीही या मंत्रवाल्या चेंडूंबाबत हार्दिकला विचारले. यावर हार्दिक पांड्या म्हणाला, “मी मुळात स्वतःला शिवीगाळ केली.मी स्वतःला मोटिव्हेट करत होती की योग्य जागी चेंडू टाक. वेगळे काही करायला जाऊ नको.” सामन्यादरम्यान हार्दिकचा तो फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये तो चेंडूसोबत बोलताना दिसत आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.