- ऋजुता लुकतुके
हार्दिक पांड्यासाठी टी-२० विश्वचषकाची मोहीम यशदायी ठरली. भारतीय संघाने चषक जिंकला आणि गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या स्पर्धेत हार्दिकने फलंदाजीत बहुमोल १४४ धावा केल्या तर गोलंदाजीत ११ बळी घेतले. फलंदाजीत त्याचा स्ट्राईक रेट १५३ धावांचा होता. या यशाच्या धुंदीत असताना आणि मुंबईसह बडोद्यातही त्याचं जल्लोषात स्वागत झालेलं असताना अचानक या आनंदात मीठाचा खडा पडला. (Hardik Pandya)
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली तेव्हा टी-२० संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचं नाही तर सूर्यकुमार यादवचं नाव होतं. हार्दिकशी आधी चर्चा झाली होती. पण, अर्थातच त्याला नेतृत्व हातातून गेल्याचं दु:ख पचवावं लागलं. (Hardik Pandya)
या निर्णयाचा थेट अर्थ हार्दिकच्या नेतृत्व गुणांवर संघ प्रशासन आणि बीसीसीआयचा विश्वास नाही असाच होतो. आता बीसीसीआयने अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर आणखी एक प्रश्न समोर आला आहे. भारतीय संघाचं नेतृत्व नाही मिळालं, आता मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीच्या नेतृत्वाचं काय होईल? (Hardik Pandya)
(हेही वाचा – Kanwar Yatra : जर मुसलमानांचा हलालसाठी आग्रह; तर कावड यात्रेकरूंचा हिंदू विक्रेत्यांचा आग्रह चुकीचा कसा?)
२०२४ च्या हंगामात रोहित शर्माकडून नेतृत्व काढून घेऊन ते रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने हा आक्रमक निर्णय घेतला. पण, तो संघाच्या अंगलट आला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा निर्णय अजिबात रुचला नाही आणि रोहितला पाठिंबा वाढत गेला. त्यामुळे हार्दिक जिथे जाईल त्याला ट्रोलिंग सुरू झालं. (Hardik Pandya)
मुंबई इंडियन्सची कामगिरी खालावली आणि संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे पुढील वर्षी मुंबई इंडियन्स देखील हार्दिच्या नेतृत्वावर विचार करतील असं चित्र आता निर्माण झालं आहे. या गोष्टीसाठी १ वर्षाचा अवकाश असला तरी इथंही सूर्यकुमार यादव हार्दिकला पर्याय असू शकतो. त्यातच हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून ऐनवेळी मुंबई इंडियन्सकडे आला होता. हार्दिक श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे आणि यात त्याला स्वत:ला नव्याने सिद्ध करावं लागेल. (Hardik Pandya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community