Hardik Pandya Social Media Record : हार्दिक पांड्याच्या सोशल मीडिया पोस्टला ६ मिनिटांत १० लाख लाईक्स; विराटचा विक्रम मोडला

Hardik Pandya Social Media Record : टी-२० विजेतेपदानंतर विराटच्या पोस्टला ७ मिनिटांत १० लाख लाईक्स मिळाले होते. 

41
Hardik Pandya Social Media Record : हार्दिक पांड्याच्या सोशल मीडिया पोस्टला ६ मिनिटांत १० लाख लाईक्स; विराटचा विक्रम मोडला
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने सोशल मीडियावरील किंग कोहलीच्या नावावरचा एक विक्रम मोडला आहे. चॅम्पियन्स कंरडकातील विजेतेपदानंतर त्याने केलेल्या एका पोस्टला इन्स्टाग्रामवर ६ मिनिटांत १० लाख लाईक्स मिळाले आहेत. भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकल्यावर हार्दिकने सोशल मीडिया स्टार खाबी लेमच्या पोझमध्ये एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. बरोबर असाच फोटो त्याने टी-२० विजेतेपदानंतरही टाकला होता. हा फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि त्यात विराट कोहलीचा लाईक्सचा जुना विक्रमही मोडीत निघाला. विराटच्या टी-२० विश्वचषक विजयानंतरच्या पोस्टला ७ मिनिटांत १० लाख लाईक्स मिळाले होते. आता हार्दिकने ६ मिनिटांत तितकेच लाईक्स मिळवले आहेत. (Hardik Pandya Social Media Record)

भारताच्या चॅम्पियन्स करंडक विजयात हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. मोहम्मद शमीच्या साथीने त्याने नवीन चेंडू हाताळला आणि दुसरीकडे सातव्या क्रमांकावर येत फटकेबाजीही केली. शेवटच्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी त्याने नियमितपणे पार पाडली. (Hardik Pandya Social Media Record)

(हेही वाचा – ICC ODI Ranking : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाच जणांमध्ये तीन भारतीय)

चॅम्पियन्स करंडकात भारताच्या युवा खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. श्रेयस अय्यरने ५ सामन्यांत मिळून भारताकडून सर्वाधिक २४६ धावा केल्या. तर शुभमन गिलने ५ सामन्यांत एका शतकासह १८८ धावा केल्या. के. एल. राहुलने सहाव्या क्रमांकावर खेळताना स्पर्धेतील सर्वाधिक १४० धावांची धावांची सरासरी राखली आणि वरुण चक्रवर्तीने ४ सामन्यांत ९ बळी मिळवले. तर अक्षर पटेलने अष्टपैलू कामगिरी बजावताना ५ बळी आणि १०९ धावा केल्या. (Hardik Pandya Social Media Record)

विराट कोहलीने अंतिम सामन्यानंतर बोलताना या खेळाडूंच्या योगदानाची तारिफ केली. ‘संघात चांगले मॅचविनर खेळाडू असताना त्या संघाचा तुम्ही एक भाग असता, तेव्हा खूप समाधान वाटतं,’ असं विराटने बोलून दाखवलं होतं. तर पांड्यानेही आपला आक्रमक बाणा दाखवून देताना कुठल्याही परिस्थितीत संघाचा विजय हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असल्याचं मत व्यक्त केलं होतं. ‘संघाच्या विजयासाठी मी काहीही करायला तयार असतो. मी कुठल्याही भूमिकेसाठी तयार असतो, जर त्यामुळे संघाचा विजय होणार असेल तर. तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली भूमिका नीट वठवणं यालाच मी परमोच्च स्थान देतो,’ असं हार्दिकने बीसीसीआयच्या व्हीडिओत म्हटलं होतं. हार्दिक आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसेल. (Hardik Pandya Social Media Record)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.