गोल्डन बॉय नीरज चोप्राचा ‘भारतीय डाक’ तर्फे ‘अनोखा’ सन्मान, वाचा सविस्तर

भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पानिपतचा नीरज चोप्रा पुरुषांच्या भाला फेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. गोल्डन बॉय भारतात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्यावर बक्षिसे आणि पैशांचा पाऊस पडू लागला. हरियाणा सरकारशिवाय इतर राज्य सरकारांनीही नीरज चोप्राचा गौरव केला. याशिवाय अनेक भेटवस्तूही त्याला देण्यात आल्या. अजूनही त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरुच आहे. आता या यादीत भारतीय डाक सेवेचेही नाव जोडले गेले आहे.

सोनेरी मुलाला सोनेरी भेट

भारतीय डाक सेवेने नीरज चोप्राला सोनेरी पत्रपेटी देऊन सन्मानित केले. भारतीय डाक सेवेने ही सोनेरी पत्रपेटी पानिपतमधील खंडारा येथे त्याच्या मूळ गावी लावली आहे. ही पत्रपेटी सोनेरी रंगात रंगवण्यात आली आहे. सोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा यांच्या सन्मानार्थ असा संदेशही त्या पत्रपेटीवर लिहिण्यात आला आहे. भारतीय डाक सेवेने ही पत्रपेटी बसवल्यापासून, त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. लोकांकडून या पत्रपेटीला खूप पसंती मिळत आहे.

( हेही वाचा: कुली ते IAS अधिकारी! वाचा… श्रीनाथची यथोगाथा! )

नीरज अमेरिकेत करतोय सराव

नीरज चोप्रा सध्या अमेरिकेत आहे. तो अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील चुला विस्टा एलिट अॅथलीट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्याने सांगितले होते की, 2022 मध्ये राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप यासारखे मोठ्या स्पर्धा आहेत. ज्यामध्ये मला चांगले काम करायचे आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या असून, लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे मी स्वतःला फीट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here