दक्षित आफ्रिकेत महिला टी-20 वर्ल्ड कप खेळवला जात आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघ या स्पर्धेत उतरला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची चौथ्या समान्यात गाठ पडली ती आयर्लंड संघाशी. या सामन्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानावर उतरताच तिच्या नावे विक्रम जमा झाला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मालाही हा विक्रम करता आलेला नाही.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात हरमनप्रीत कौर पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. 150 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर जमा झाला आहे. पुरुष भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही तीने मागे टाकले आहे. रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत 148 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांची नोंद आहे. आता सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा मान हरमनप्रीत कौरच्या नावावर जमा झाला आहे. हरमनप्रीतने 11 जून 2009 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा बनवले; भगतसिंह कोश्यारींची टीका )
हरमनप्रीत कौरची कारकीर्द
हरमनप्रीत कौरने आतापर्यंत भारतासाठी 3 कसोटी सामने, 124 एकदिवसीय आणि 150 टी-20 सामने खेळले आहेत. 3 कसोटीच्या पाच इनिंगमध्ये तीने 38 धावा केल्या आहेत. तर 124 एकदिवसीय सामन्यात तिने 38.18 च्या अॅव्हरेजने 3 हजार 322 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात तिचा 171 सर्वाधिक स्कोर आहे.
Join Our WhatsApp Community