महिला टी२० विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला. केपटाऊनमध्ये झालेल्या या लढाईमध्ये टीम इंडियाचा अवघ्या ५ धावांनी पराभव झाला आणि महिला टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियातील सर्व महिला खेळाडू अत्यंत निराश झाल्या. या सामन्यात हरमनप्रीत कौर बाद झाल्यावर चित्र पालटले.
( हेही वाचा : बेस्ट लवकरच सुरू करणार वॉटर टॅक्सी! बस जमीन-पाण्यावर धावणार? उपक्रमाकडून चाचपणी सुरू)
टीम इंडियाच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचे सर्वप्रथम हरमनप्रीतने कौतुक केले. आम्ही पराभवाची अपेक्षा केली नव्हती असेही ती म्हणाली.
पुढे हरमनप्रीत कौर म्हणाली, “यापेक्षा दुर्दैवी मला कधीच वाटू शकत नाही. जेमिमाच्या खेळामुळे आम्हाला गती मिळाली. सामना अशा स्टेजला येऊन आम्हाला हरण्याची अपेक्षाच नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले, यापेक्षा दुर्दैवी आणखी काही असू शकत नाही. आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचे होते. सुरूवातीला विकेट जाऊन सुद्धा आम्हाला जेमिमामुळे मोमेंटम मिळाला. काही सोप्या कॅचेस आम्ही सोडल्या आज क्षेत्ररक्षणात सुद्धा काही चूका झाल्या” असेही भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नमूद केले.
सेमीफायनल्समध्ये १७३ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाने ३.४ षटकांत २८ धावा करून ३ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर हरमनप्रीत कौरने डाव सांभाळला आणि ३४ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या मात्र ती धावबाद झाल्याने या खेळीचा फारसा फायदा टीम इंडियाला झाला नाही.