-
ऋजुता लुकतुके
इंग्लिश क्रिकेट संघात नवीन स्थित्यंतर आलं असून टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. २६ वर्षीय हॅरी ब्रूककडे (Harry Brook) संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. चॅम्पियन्स करंडकातील खराब कामगिरीची जबाबदारी घेत जोस बटलरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने २०२२ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. पण, नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडकात इंग्लिश संघ एकही सामना जिंकू शकला नाही. उलट हॅरी ब्रूकची (Harry Brook) कामगिरी उल्लेखनीय झाली होती. स्पर्धेनंतर लगेचच बटलरने नेतृत्व सोडण्याचं सुतोवाच केलं होतं.
हॅरी ब्रूककडे (Harry Brook) नैसर्गिक नेतृत्व गुण असल्याचं बोललं जातं. २०२२ पासून इंग्लिश संघाचा तो एक अविभाज्य भाग आहे. कसोटी संघातही त्याने जम बसवला आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत त्याने इंग्लंडचं नेतृत्व केलं आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तोच कर्णधार होता. तर १९ वर्षीय संघाचंही नेतृत्व त्याने केलं आहे.
(हेही वाचा – आता महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदतीला असणार Sakhi Desk)
Harry Brook is England’s new white-ball captain and he’s just 26 years old.pic.twitter.com/iDIN1lelKO
— CricTracker (@Cricketracker) April 7, 2025
‘इंग्लिश राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करणं हा माझा मोठा बहुमान आहे. लहानपणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा कायम यॉर्कशायरसाठी आणि इंग्लिश संघासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं. त्याचबरोबर कधीतरी नेतृत्व करायला मिळावं हे स्वप्नही होतंच. ही मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रामाणिकपणे निभावेन,’ असं ब्रूकने (Harry Brook) या नेमणुकीनंतर म्हटलं आहे.
हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ पहिली मालिका खेळेल ती वेस्ट इंडिजविरुद्ध. आणि त्यानंतर वक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community