- ऋजुता लुकतुके
भारतातील सगळ्यात तेज गोलंदाज असलेला आणि ताशी १५७ किमी वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम नावावर असलेला मयंक यादव (Mayank Yadav) अखेर पहिल्यांदा भारताकडून खेळला आहे. ते करताना त्याने एक विक्रमही नावावर केला. नुकता दुखापतीतून उठलेला मयंक काय वेगाने गोलंदाजी करतो याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. रविवारी त्याचा सरासरी वेग १४० किमी इतकाच होता. पण, गोलंदाजीतील अचूकता कायम होती. यंदा आयपीएलमध्येही त्याने १५७ किमीच्या वेगाने गोलंदाजी करतानाही अचूकतेचं प्रदर्शन घडवलं होतं.
यावेळी त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात आपली चमक दाखवलीच. २१ धावांत त्याने १ बळी मिळवला. त्यातही पहिलं षटक त्याने निर्धाव टाकलं. त्याबरोबरच एक विक्रम त्याच्या नावावर लागला. अजित आगरकर आणि अर्शदीप सिंग नंतर पदार्पणात पहिलंच षटक निर्धाव टाकणारा तो भारताचा फक्त तिसरा गोलंदाज आहे.
(हेही वाचा – CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत पुढे ढकलली; काय आहे कारण ?)
The first of many more! ⚡️
📽️ WATCH Mayank Yadav’s maiden international wicket 😎
Live – https://t.co/Q8cyP5jXLe#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Q0XvZGBQrq
— BCCI (@BCCI) October 6, 2024
अजिंत आगरकर – वि. दक्षिण आफ्रिका (२००६)
अर्शदीप सिंग – वि. इंग्लंड (२०२२)
मयंक यादव – वि. बांगलादेश (२०२४)
(हेही वाचा – Prithviraj Chavan यांना निवडणूक जड जाणार ? सांगली पॅटर्न साताऱ्यातही राबवणार !)
२२ वर्षीय मयंक यादवने (Mayank Yadav) २०२४ च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याचा वेग आणि अचूकता लक्षवेधी ठरली. दुखापतीमुळे तो पूर्ण हंगाम खेळू शकला नाही. पण, फक्त ४ सामन्यांत त्याने ७ बळी मिळवले. त्याचा स्ट्राईक रेट फक्त १० धावांचा होता. १५६.७ किमी वेगाने त्याने टाकलेला चेंडू हा भारतासाठी सर्वोच्च वेगाचा चेंडू ठरला होता. त्यानंतर दुखापतींमुळे तो मधले चार महिने खेळू शकला नव्हता.
भारतीय संघातून पदार्पण केल्यानंतर आता आयपीएलमध्येही त्याने अननुभवी म्हणजेच अनकॅप्ड खेळाडूचा शिक्का पुसून टाकला आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही त्याला चांगली किंमत मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community