बजरंग पुनियाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदकं जिंकणारा पहिला भारतीय

भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती पदक जिंकले आहे. त्याने पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणलं आहे. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने बेलग्रेडमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. बजरंग पुनिया हा जागितक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे.

पुनियाने आपली उत्कृष्ट खेळीची झलक अवघ्या जगाला पुन्हा एकदा दाखवली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनियाने सुवर्णपदक जिंकले होते. पुनियाविषयी अधिक बोलायचे झाल्यास त्याने 2013 मध्ये कांस्यपदक, 2018 मध्ये रौप्य आणि 2019 मध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकले आहे.

( हेही वाचा: “शिल्लक सेनेच्या ‘टोमणे’ मेळाव्याला मुंबई मनपाने परवानगी द्यावी,महाराष्ट्राला मनोरंजनापासून वंचित ठेवू नये” )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here