Hockey League : हॉकी इंडिया लीगच्या पुनरुज्जीवनासाठी हॉकी इंडिया करणार ३,६४० कोटी रुपये खर्च

Hockey League : शेवटची लीग सात वर्षांपूर्वी खेळवली गेली होती. 

31
Hockey League : हॉकी इंडिया लीगच्या पुनरुज्जीवनासाठी हॉकी इंडिया करणार ३,६४० कोटी रुपये खर्च
  • ऋजुता लुकतुके

टोकयो ऑलिम्पिक आणि पाठोपाठ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने कांस्य पदक जिंकल्यामुळे भारतीय हॉकी संघ सध्या नवीन जोशात आहे. अलीकडेच आशियाई चॅम्पियन्स स्पर्धाही भारतीय पुरुषांनी जिंकली आहे. भारतीय खेळाडूंच्या या यशामुळे हॉकी इंडियालाही नवीन जोम आला असून त्यांनी प्रो हॉकी लीग पुनरुज्जीवित करायचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून या स्पर्धेसाठी खास वेळ राखून ठेवण्यात हॉकी इंडिया यशस्वी झाली आहे. (Hockey League)

(हेही वाचा – Firecrackers : हिंदू देवी- देवतांची चित्रे असणाऱ्या फटाक्यांची विक्री नको, सकल हिंदू समाजाची मागणी)

प्रो हॉकी लीगवर तब्बल ३,६४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हॉकी इंडिया या लीगवर मागचे सहा महिने काम करत आहे. त्यानंतर पुरुषांचे ८ आणि महिलांचे ६ संघ घेऊन लीग सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. आतापर्यंत १० फ्रँचाईजी मालक संघांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी समोर आले आहेत. या मालकांबरोबर तब्बल १० वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा ही लीग शाश्वत असेल असा अंदाज आहे. (Hockey League)

(हेही वाचा – Indian Forex Reserves : भारताची परकीय गंगाजळी विक्रमी ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरवर)

खेळाडूंचा लिलावही १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. आगामी १० वर्षांसाठी या लीगवर हॉकी इंडियाचे ३,६४० कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे दरवर्षीचा खर्च हा ११२ कोटी रुपये असेल. पहिला हंगाम डिसेंबर २८ ते १ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्याचा हॉकी इंडियाचा विचार आहे. पुरुषांच्या लीगचे सर्व सामने हे रुरकेला इथं होतील तर महिलांच्या लीगचे सामने रांची इथं खेळवले जाणार आहेत. महिला लीगचा अंतिम सामना २६ जानेवारीला रांची इथं तर पुरुषांच्या लीगचा अंतिम सामना १ फेब्रुवारीला रुरकेला इथं होणार आहे. पुरुषांच्या लीगमध्ये ८ संघ तर महिलांच्या लीगमध्ये सध्या ४ संघ असतील. जगभरातील खेळाडूंचा या लीगला चांगला पाठिंबा मिळेल असा अंदाज आहे. (Hockey League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.