भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) कांस्यपदक जिंकताना स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारत भारताचे हे सलग दुसरे कांस्यपदक (bronzemedal) ठरले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारताने हॉकीच्या (Indian Hockey team) कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनला कडवी झुंज दिली. स्पेनने सामन्याच्या १८ व्या मिनिटाला गोल केला होता. त्यामुळे त्यांनी १-० अशी आघाडी घेतली होती. पण भारतानेही हार मानली नाही. दुसरे सत्र संपायला फक्त ४८ सेकंदं शिल्लक असताना भारताने पेनेल्टी कॉर्नरवर गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. भारताने त्यानंतर पेनेल्टी कॉर्नरवर ३३ व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल केला आणि भारताने २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारताने तिसऱ्या सत्रातही कायम ठेवली. चौथ्या सत्रातही भारताने दमदार कामगिरी केली. (Hockey Olympic 2024)
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. हॉकी टीम इंडियाने स्पेनला पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली आहे. हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने स्पेनवर 2-1 अशा फरकाने मात केली आहे.
.#Hockeyteam #bharat #bronzemedal #parisolympics #olympics2024 pic.twitter.com/e5G3vSf4y5— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 8, 2024
पहिल्या सत्रात भारत आणि स्पेन दोघांनाही गोल करता आला नाही. पण दुसऱ्या सत्रातील १८ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंच्या चुकीमुळे स्पेनला पेनेल्टी स्ट्रोक देण्यात आला. स्पेनने या सुवर्णसंधीचा चांगलाच फायदा उचलला आणि त्यांनी गोल केला. त्यामुळे स्पेनने सामन्याच्या १८ व्या मिनिटालाच १-० अशी आघाडी घेता आली. पण दुसऱ्या सत्राची फक्त ४८ सेकंदं शिल्लक असताना भारताला पेनेल्टी कॉर्नर मिळाला होता. या संधीचा पुरेपूर फायदा भारताने उचलला आणि गोल केला. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारताने १-१ अशी बरोबरी साधली होती. (Hockey Olympic 2024)
(हेही वाचा – Parliament Session : वक्फ कायदा १९९५ सुधारणा विधेयक संसदेत सादर)
भारत आणि स्पेन (India and Spain hockey team) यांच्यातील हॉकी सामन्याचे पहिले सत्र चांगलेच रंगले. स्पेनचा संघ हा यावेळी जोरदार आक्रमण करत होता. पण त्याचवेळी भारताचा उत्तम बचाव यावेळी पाहायला मिळाला. त्यामुळेच स्पेनला यावेळी गोल करण्यात यश मिळत नव्हते. पण भारतीय संघ हा फक्त बचाव करत नव्हता, तर त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते जोरदार आक्रमणही करत होते. पण त्यांना पहिल्या सत्रात स्पेनचा बचाव भेदता आला नव्हता. (Hockey Olympic 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community