-
ऋजुता लुकतुके
भारतीय पुरुषांच्या हॉकी संघाने (Hockey Team Bags Bronze) गुरुवारी स्पेनचा २-१ ने पराभव करत सलग दुसरं कांस्य पदक आपल्या नावावर केलं. उपांत्य सामन्यात जर्मनीविरुद्ध सरस खेळ करूनही भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यामुळे सुवर्ण पदकाची संधीही हुकली होती. त्यामुळे या कांस्य पदकाचं मोल भारतीय हॉकीसाठी मोठं होतं. आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला.
(हेही वाचा- देशवासीयांसाठी खुशखबर! BSNL ने देशभरात उभारले १५ हजार 4G टॉवर्स)
‘चक दे इंडिया’ चा नारा ड्रेसिंग रुममध्ये सुरू होता. विजयाचे चित्कार ऐकू येत होते. भारतीय संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी बजावली आहे. (Hockey Team Bags Bronze)
𝐓𝐡𝐢𝐬 𝐁𝐫𝐨𝐧𝐳𝐞 𝐌𝐞𝐝𝐚𝐥 𝐢𝐬 𝐟𝐨𝐫 𝐈𝐧𝐝𝐢𝐚!
Consecutive bronze medals for team India, we defeat Spain in the Bronze Medal match.
Full-Time:
India 🇮🇳 2️⃣ – 1️⃣ 🇪🇸 Spain#Hockey #HockeyIndia #IndiaKaGame #WinItForSreejesh #Paris2024 #INDvsESP@CMO_Odisha… pic.twitter.com/WlpzrZu4jh— Hockey India (@TheHockeyIndia) August 8, 2024
#Paris2024 | And the celebrations have begun in the Indian #hockey team’s dressing room #Olympics #OlympicGames
📽️FIH pic.twitter.com/baeAk5vasl
— Sandip Sikdar (@ronnie_sandip) August 8, 2024
ऑलिम्पिक हॉकीच्या इतिहासात भारतीय संघाने मिळवलेलं हे चौथं कांस्य पदक आहे. टोकयो ऑलिम्पिकनंतर लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत त्यांनी कांस्यची कमाई केली आहे. तर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताच्या नावावर आता हॉकीत ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकं जिंकली आहेत. भारतीय कर्णधार हमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) गोलच्या बाबतीत या ऑलिम्पिकमध्ये सरस ठरला. आणि कांस्य पदकाच्या लढतीतही त्याने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. (Hockey Team Bags Bronze)
(हेही वाचा- Neeraj Chopra Silver : नीरजचं सुवर्ण हुकलं, सलग २ ऑलिम्पिकमध्ये पदकांचा विक्रम )
या विजयानंतर हॉकी इंडियाने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला १५ लाख रुपये देऊ केले आहेत. (Hockey Team Bags Bronze)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community