Hockey Team Bags Bronze : ‘सरपंच साहेब,’ म्हणत हरमनप्रीतला जेव्हा पंतप्रधान मोदींनी घातली साद 

Hockey Team Bags Bronze : ऑलिम्पिक कांस्य विजेत्या संघाशी पंतप्रधान मोदींनी फोनवरून संवाद साधला 

163
Hockey Team Bags Bronze : ‘सरपंच साहेब,’ म्हणत हरमनप्रीतला जेव्हा पंतप्रधान मोदींनी घातली साद 
Hockey Team Bags Bronze : ‘सरपंच साहेब,’ म्हणत हरमनप्रीतला जेव्हा पंतप्रधान मोदींनी घातली साद 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी अभिनंदन केलं. फोनवरून संघाशी संवादही साधला. १९७२ नंतर पहिल्यांदाच हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. त्यामुळे या विजयाचं मोल मोठं आहे. एकीकडे भारतीय ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन कर्णधार हमनप्रीतच्या (Hamanpreet) फोनवर खणाणला. तो व्हीडिओ कॉल होता. हरमनप्रीत समोर दिसताच नरेंद्र मोदी यांनी, ‘सरपंच साहेब!’ असं म्हटत गप्पांना सुरुवात केली. (Hockey Team Bags Bronze)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक)

‘तुझं आणि तुझ्या सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. खेळाडूंची हिंमत आणि खिलाडू वृत्ती तसंच जिद्द यामुळे देशाचं नाव जगात मोठं झालं आहे,’ असं नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संघाला उद्देशून म्हणाले. उपांत्य लढतीतील पराभवातून सावरून संघाने मिळवलेल्या यशाचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. (Hockey Team Bags Bronze)

 उपांत्य फेरीच्या लढतीत चेंडूवर जास्त वेळ ताबा असतानाही शेवटच्या क्षणी भारताचा घात झाला होता. जर्मनीने भारताला ३-२ असं हरवलं. त्यातच कांस्य पदकाच्या लढतीतही स्पेनने अठराव्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत खातं उघडलं होतं. त्यामुळे भारतीय संघ सुरुवातीला बॅकफूटवर होता. पण, त्यानंतर हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. (Hockey Team Bags Bronze)

(हेही वाचा- Road Manholes : बोरीवलीत मॅनहोल मध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू)

शेवटच्या क्वार्टरमध्ये स्पेननेही बरोबरीचे सर्व प्रयत्न केले. शेवटच्या ६ मिनिटांत धसमुसळ्या हॉकीचं प्रात्यक्षिक दोन्ही संघांनी दाखवलं. पण, अखेर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या पी आर श्रीजेशने (PR Sreejesh) गड अभेद्य ठेवला. भारतीय संघाने विजय मिळवला. विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात फेरफटका मारून चाहत्याचं अभिनंदन स्वीकारलं. यात खेळाडूंनी श्रीजेशला (PR Sreejesh) खांद्यावर उचलून घेतलं होतं. (Hockey Team Bags Bronze)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.