Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत भारताचा सहभाग

Hong Kong Sixes : यापूर्वी सचिन आणि धोनी या स्पर्धेत खेळलेले आहेत.

121
Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत भारताचा सहभाग
  • ऋजुता लुकतुके

हाँगकाँग सिक्सेस (Hong Kong Sixes) ही आशियातील सगळ्यात छोटी क्रिकेट स्पर्धा सात वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. विशेष म्हणजे भारत या स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेचा हा २० वा हंगाम आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा हाँगकाँग इथंच होणार आहे. ही सगळ्यात छोटेखानी स्पर्धा आहे कारण, इथं एका संघात फक्त सहा खेळाडू असतात. सामना ५ षटकांचा असतो. यंदा भारतीय संघ सहभागी होणार असल्यामुळे हाँगकाँग क्रिकेटने त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

‘एचके६ स्पर्धेत भारतीय संघही सहभाही होणार आहे आणि चेंडू स्टेडिअमबाहेर भिरकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. त्यामुळे यंदा स्पर्धेत भरपूर हाणामारी आणि षटकारांचं वादळ पाहायला मिळणार हे नक्की,’ असं आयोजकांनी आपल्या ट्विटर संदेशात लिहिलं आहे.

(हेही वाचा – Sanjay Raut : सुषमा अंधारेंनी उमेदवाराची घोषणा करताच संजय राऊत चिडले!)

यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी इथं खेळलेले आहेत. क्रिकेटमधील सगळ्यात छोटा फॉरमॅट पण, अतिशय ऊर्जेनं खेळली जाणारी स्पर्धा (Hong Kong Sixes) म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. अंतिम फेरीत प्रत्येकी ८ षटकं होतात. खेळाडू या प्रकारात अधिकाधिक षटकार खेचण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या स्पर्धेची रंगत वेगळी आहे. कारण, इथं प्रत्येक चेंडूवर घेतलेल्या धावेला महत्त्व आहे. ब्रायन लारा, वसिम अक्रम आणि शेन वॉर्न या दिग्गज खेळाडूंनाही या स्पर्धेनं भुरळ घातली आहे.

यंदाच्या हंगामात भारत आणि पाकिस्तानबरोबरच आणखी १० संघ सहभागी होणार आहेत. द आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तानी संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी ५ विजेतेपदं पटकावली आहेत. या स्पर्धेचे नियम काहीसे विचित्र आणि वेगळे आहेत. (Hong Kong Sixes)

(हेही वाचा – जगभरात Instagram डाऊन! रील पाहता-पाहता Logout होत आहे अकाउंट)

  • प्रत्येक सामन्यात ६ चेंडूंची १० षटकं होतील. (प्रत्येक संघाला ५ षटकं मिळतील. अंतिम सामन्यात ८ चेंडूंचं एक षटक). यष्टीरक्षक सोडला तर इतर पाचही खेळाडू एकेक षटक टाकतील.
  • ३१ धावा झाल्यावर फलंदाज निवृत्त होईल. तळाचे फलंदाज संपले तरंच त्याला परत फलंदाजी करता येईल
  • ५ बळी गेलेले असतील तर शेवटचा फलंदाज षटकं संपेपर्यंत खेळत राहील. पण, त्याला फक्त त्याला स्ट्राईक मिळणार नाही. तो फक्त साथीदाराबरोबर धावा काढू शकेल. स्ट्राईक प्रत्येक वेळी नाबाद फलंदाजच घेईल.
  • वाईड आणि नोबॉलवर प्रत्येकी २ धावा मिळतील
  • प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघांना २ गुण मिळतील (Hong Kong Sixes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.