भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान विश्वचषक (Ind vs Aus World Cup) क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) रंगणार आहे. या ‘हाय व्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. या सामन्याचा थरार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी विमानाने थेट अहमदाबाद गाठण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विमानांचे तिकीट दर गगनाला भिडले असून, एरवीच्या तिकिटाच्या किमतीपेक्षा दुपट्टीने विकली जात आहे. साध्या हॉटेलचे एका रात्रीसाठीचे भाडेच 10,000 रुपयांच्या घरात आहे. तर आलिशान हॉटेलमध्ये त्यासाठी प्रेक्षकांना जवळपास 1 लाख रुपयांचा खर्च मोजावा लागणार आहे. ( World Cup 2023 Final )
अहमदाबादसाठीच्या विमानाच्या दरात २००-३००% वाढ झाली आहे. अंतिम सामन्यासाठी दिल्लीहून अहमदाबादाकडे जाणाऱ्या विमानाचे भाडे 15,000 रुपये आहे. तसेच नाशिकहून एरवी चार ते पाच हजार असणारे तिकीट दुपट्टीने वाढ झाली आहे. तेही शनिवार पासून 15,000 रुपये आहे. अहमदाबाद येथे राहण्याची व्यवस्था आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक दिव्य करावे लागत आहे. या सामन्यासाठी होणारी गर्दी पाहता सर्वच वस्तूच्या किंमती वाढल्याचे दिसून येत आहे. ( World Cup 2023 Final )
यंदाच्याच वर्ल्ड कपमध्ये भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत १४ ऑक्टोबर रोजी सामना झाला होता. तो पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी विमानाने अहमदाबादला गेले होते. आता अंतिम सामन्यात भारताचा प्रवेश निश्चित होताच हा सामना थेट स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचे क्रिकेटप्रेमींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर अहमदाबादला कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवा हाच एकमेव पर्याय आहे. या सेवेच्या मागणीत अचानक प्रचंड वाढ झाली असून, त्यामुळे विमान कंपनीने तिकीटदरात जवळपास दुपटीने वाढ केली आहे. ( World Cup 2023 Final )
(हेही वाचा : Ind vs Aus : भारतीय संघाच्या यशामागील पडद्या मागचे चेहरे)
अनेकांनी आधीच केले बुकिंग
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ ऐन भरात असून, भारतच अंतिम फेरी गाठणार, अशी अटकळे यापूर्वीच क्रिकेटप्रेमींनी बांधली होती. त्यामुळे अनेकांनी यापूर्वीच सामन्याची व विमानाची तिकिटे आधीच बुक करून ठेवली आहेत. काही जणांकडून मात्र भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर दोन्ही तिकिटे मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच येण्याची चिन्हे आहेत. कारण अंतिम सामन्याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत. आहे त्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असून, त्याची किंमत तब्बल लाखापर्यंत गेल्याचे कळते.
प्रवास आणि राहण्याची व्यवस्था महाग
हॉटेलचा टेरिफ प्लॅन वाढला आहे. बुकिंगडॉटकॉम, मेकमायट्रिप,एगोडा यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च होत आहे. हॉटेल्समध्ये राहण्यासाठी सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे.
(हेही वाचा :World Cup Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा भर ‘या’ पाच मुद्दयांवर)