- ऋजुता लुकतुके
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी-२० विश्वचषक संपला की, सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. द्रविड यांना मुदत वाढ नको आहे आणि ते नव्याने अर्जही करणार नाहीत, हे त्यांनी जवळ जवळ स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नवीन प्रशिक्षक नेमण्यासाठी बीसीसीआयची (BCCI) शोधाशोध सुरू झाली आहे. पदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही २७ मे आहे. पण, त्यापूर्वी बीसीसीआयने पडद्यामागे काही हालचाली सुरू केल्या आहेत. (Hunt For New Coach)
यापूर्वी क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर, स्टिफन फ्लेमिंग आणि गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चाही झाली आहे. लक्ष्मण आणि लँगर यांनी भारतीय संघाबरोबर सततचा प्रवास करता येणार नाही, असं सांगून प्रशिक्षक पदासाठी उत्साह दाखवला नाही. लँगरने तर प्रसार माध्यमांकडेच तसं मत व्यक्त केलं आहे. (Hunt For New Coach)
त्यानंतर आता बीसीसीआयने (BCCI) अनधिकृतपणे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांच्याशी संपर्क केला असल्याचं समजतंय. अगदी सुरुवातीपासून स्टिफन फ्लेमिंग चेन्नई फ्रँचाईजीबरोबर आहे आणि भारतीय वातावरण आणि इथल्या क्रिकेटशी त्यांनी छान जुळवून घेतलं आहे. त्यामुळेच फ्लेमिंग यांच्याबरोबर बीसीसीआयने (BCCI) एक बैठकही घेतली असल्याचं इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने म्हटलं आहे. पण, त्याचबरोबर भारतीय संघाबरोबर वर्षातील १० महिने रहावं लागणार असल्यामुळे फ्लेमिंग यांनी अजून तरी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. (Hunt For New Coach)
Every move with his guidance,
Every roar with his inputs,
Every step with his support,
Our Gaffer! 🦁#WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/lZMmfaMx3q— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2024
(हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar मध्ये एकमेव मुलीला १०० टक्के गुण!)
चेन्नई फ्रँचाईजी फ्लेमिंग विषयी म्हणाली…
शेवटच्या साखळी सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगला संघाने सोशल मीडियावर मानवंदना दिली आहे, (Hunt For New Coach)
त्याच्या मार्गदर्शनाखाली रचलेली प्रत्येक चाल
त्याच्या सल्ल्याने मिळवलेले विजय
प्रत्येक पावलावर त्याची साथ
असा हा आमचा बॉस! असं या पोस्टमध्ये चेन्नई फ्रँचाईजीने फ्लेमिंग विषयी म्हटलं आहे. पण, फ्लेमिंगचं बीसीसीआयबरोबर बोलणं झाल्याची कुठलीही माहिती आपल्याला नाही, असंही फ्रँचाईजीने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी दिलेले निकषही चर्चेचा विषय ठरले आहेत. ३० कसोटी आणि ५० एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडूच अर्ज करू शकणार आहे. (Hunt For New Coach)
स्टिफन फ्लेमिंग या निकषात बसत असला तरी तो भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम पेलवू शकेल का हा प्रश्न आहे. त्याचा निर्णयही त्यावरच आधारित असणार आहे. (Hunt For New Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community