टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात रंगला आणि या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर ५ विकेट्सनी विजय मिळवत दुसऱ्या विजेतेपदावर नाव कोरले. इंग्लंडने याआधी २०१० मध्ये विजेतेपद पटकावले होते. या अंतिम सामन्यानंतर ICC ने टी२० वर्ल्डकप २०२२ च्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात १२ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात इंग्लंडचे सर्वाधिक ४ खेळाडू असून १२ व्या खेळाडूसह भारताचे ३ खेळाडू आहेत.
( हेही वाचा : T20 World Cup : भारतीय संघावर चौफेर टीका; सचिनने टीकाकारांना सुनावले! म्हणाला, एका पराभवामुळे…)
पाकिस्तानच्या २, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर म्हणून या संघात जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीने या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. पाचव्या स्थानावर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचे नाव आहे, ज्याने एका शतकासह २१० धावा केल्या आहे. झिम्बाव्बेच्या सिकंदर रजाला सहावे स्थान देण्यात आले आहे.
Four 🏴 players and two each from 🇵🇰 and 🇮🇳
The @upstox Most Valuable Team of the Tournament ⬇️#T20WorldCup https://t.co/wdGDTWMiUA
— ICC (@ICC) November 14, 2022
ICC ने जाहीर केलेला सर्वोत्तम संघ
- जोस बटलर ( कर्णधार आणि विकेटकीपर) – इंग्लंड
- एलेक्स हेल्स – इंग्लंड
- विराट कोहली – भारत
- सुर्यकुमार यादव – भारत
- ग्लेन फिलिप्स – न्यूझीलंड
- सिकंदर रजा – झिम्बाब्वे
- शादाब खान – पाकिस्तान
- सॅम करन – इंग्लंड
- एनरिक नोर्जे – दक्षिण आफ्रिका
- मार्क वूड – इंग्लंड
- शाहीन आफ्रिदी – पाकिस्तान
- हार्दिक पंड्या – भारत