ICC Champions Trophy 2025 : आयसीसी २९ नोव्हेंबरच्या बैठकीत चॅम्पियन्स करंडकावर निर्णय घेण्याची शक्यता

ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिल्याने स्पर्धेविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

28
ICC Champions Trophy 2025 : आयसीसी २९ नोव्हेंबरच्या बैठकीत चॅम्पियन्स करंडकावर निर्णय घेण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकाच्या भवितव्याचा फैसला आता २९ नोव्हेंबरला होईल असं दिसत आहे. या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने सदस्य देशांच्या क्रिकेट संघटनांची ऑनलाईन बैठक बोलावली आहे. सगळ्यांचं म्हणणं समजून घेऊन चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर निर्णय घेतला जाईल. भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिला आहे. आणि स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलची मागणी केली आहे. तर पाकिस्तानने अख्खी स्पर्धा पाकिस्तानमध्येच व्हावी असा आग्रह धरला आहे. (ICC Champions Trophy 2025)

यामुळे स्पर्धेचा कार्यक्रमही अजून जाहीर होऊ शकलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा व्हायची आहे. विशेष म्हणजे भारताचे जय शाह १ डिसेंबरला आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कारभार हातात घेणार आहेत. त्यापूर्वी दोन दिवस आधी ही बैठक होणार आहे. (ICC Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Amit Shah यांनी एक्सवर मानले महाराष्ट्रवासियांचे आभार)

नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येण्यापूर्वी चॅम्पियन्स करंडकाविषयी निर्णय होणं हे सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. नुकतीच पाकिस्तानमध्ये राजकीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे श्रीलंका अ संघ खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेत परतला आहे. ही गोष्टही पाकिस्तानच्या विरोधात जाऊ शकते. भारत सरकारने संघाला तिथे पाठवण्याची परवानगी दिली नाही तर भारतीय संघाचे सामने बाहेर खेळवणे हा पर्याय असू शकतो. (ICC Champions Trophy 2025)

आणि या पर्यायासाठी पाकिस्तान सहमत नसेल तर भारतीय संघाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. आणि त्यांच्या ऐवजी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत नवव्या क्रमांकावर असलेला श्रीलंकन संघ चॅम्पियन्स करंडक खेळण्यासाठी पात्र ठरेल. आयसीसीच्या नियमानुसार, एखाद्या संघाला परदेशात खेळण्याची सक्ती करता येत नाही. शिवाय आयसीसी देशातील केंद्रीय सरकारबरोबरही वाटाघाटी करत नाही. त्यामुळे ते भारताला पाकिस्तानात जाण्याची सक्ती करू शकत नाहीत. (ICC Champions Trophy 2025)

(हेही वाचा – “तुम्ही आता फक्त घोषणा देण्याचं काम करा”, Sanajy shirsat यांचा राऊतांना टोला)

आणि भारतातून कुणालाही पाकिस्तानला जायचं असेल तर त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी लागते. अलीकडे भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघाने २ दिवसांचा पाकिस्तान दौरा केला होता. पण, तेव्हा खेळाडूंना टेनिस कोर्ट आणि हॉटेलच्या पलीकडे कुठेही जाण्याची मनाई भारत सरकारने केली होती. आणि २ दिवसांत संघ मायदेशी परतला. चॅम्पियन्स करंडकाचा दौरा मोठा आणि खेळाडूंची संख्याही जास्त असणार आहे. भारताने चॅम्पियन्स करंडकासाठी संघ पाठवला नाही तर पाकिस्तानही आयसीसी स्पर्धांसाठी भारतात संघ पाठवणार नाही, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. (ICC Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.