- ऋजुता लुकतुके
अपेक्षेप्रमाणेच चॅम्पियन्स करंडकाचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं आहे. हायब्रीड मॉडेलनुसार, आता पाकिस्तानबरोबरच संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा संयुक्तपणे होणार आहे. १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. तर भारताचे सामने दुबईत होणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही हे निश्चित झाल्यावर आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. (ICC Champions Trophy 2025)
भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे आणि भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. तर लक्षवेधी भारत-पाकिस्तान लढत २३ फेब्रुवारीला दुबईतच होणार आहे. तर भारताचा शेवटचा साखळी सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. (ICC Champions Trophy 2025)
(हेही वाचा – काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला; CM Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)
Check out the full fixtures for the ICC Champions Trophy 2025. pic.twitter.com/oecuikydca
— ICC (@ICC) December 24, 2024
४ आणि ५ मार्चला दोन्ही उपांत्य लढती होणार आहेत. तर अंतिम लढत ९ मार्चला लाहोर इथं होणार आहे. पण, दर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर ही लढतही पाकिस्तानबाहेर खेळवण्यात येईल. भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर हायब्रीड मॉडेलचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. त्यानुसार, भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. (ICC Champions Trophy 2025)
(हेही वाचा – BMC : बेस्टला आतापर्यंत महापालिकेने केली ११,२३२ कोटी रुपयांची मदत)
चॅम्पियन्स करंडकातील भारताच्या लढती,
२० फेब्रुवारी – भारत वि. बांगलादेश (दुबई)
२३ फेब्रुवारी – भारत वि पाकिस्तान (दुबई)
२ मार्च – भारत वि. न्यूझीलंड (दुबई)
४ मार्च – पहिला उपांत्य सामना (भारतीय संघ पात्र असल्यास दुबई)
५ मार्च – दुसरा उपांत्य सामना (भारतीय संघ पात्र असल्यास दुबई)
९ मार्च – अंतिम फेरी (भारतीय संघ पात्र ठरल्यास दुबई)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community