ICC Champions Trophy : रोहितसेना पाकचं पॅकअप करणार ? IND vs PAK सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष

44
ICC Champions Trophy : रोहितसेना पाकचं पॅकअप करणार ? IND vs PAK सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष
ICC Champions Trophy : रोहितसेना पाकचं पॅकअप करणार ? IND vs PAK सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी दुबई (Dubai) सज्ज झाली आहे. उभयसंघातील सामना हा दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. (ICC Champions Trophy)

भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही तर, त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल. तसेच, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दव पडत नाही, त्यामुळे गोलंदाजीदरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. दोन्ही संघांच्या कर्णधारांचा आपल्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागावा, अशी इच्छा असणार आहे. दुबईतील आकडेवारी पाहता टॉस जिंकणारा संघ पहिले बॉलिंग घेऊ शकतो. (ICC Champions Trophy)

दुबईतील गेल्या 10 सामन्यांमधील आकडेवारी
दुबईत गेल्या 10 सामन्यांमध्ये टॉस जिंकून 7 वेळा पहिले फिल्डिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. दुबईत आतापर्यंत एकूण 58 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 35 सामन्यांत पहिले फिल्डिंग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार, दुबईत टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेणाऱ्या संघाला विजयी होण्याची अधिक संधी आहे, असं म्हणू शकतो. दरम्यान टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने हे विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. (ICC Champions Trophy)

ऋषभ पंतला ताप
टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत उपस्थित होता. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल शुभमन गिला म्हणाला की, हा एक मोठा सामना आहे, पण कोणत्याही स्पर्धेतील सर्वात मोठा सामना हा अंतिम सामना असतो. दरम्यान, दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळणारी टीम इंडिया आयसीसी अकादमीमध्ये सराव करत आहे. शनिवारी, विराट कोहलीसह काही खेळाडू वेळेच्या 1 तास आधी पोहोचले आणि सराव सुरू केला. यानंतर उर्वरित खेळाडू सरावासाठी आले पण यष्टीरक्षक ऋषभ पंत आला नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेत शुभमन गिलला ऋषभ पंतबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ऋषभ पंतला ताप आल्याची माहिती शुभमन गिलने दिली. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. (ICC Champions Trophy)

भारताचा संघ (Team India) :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह. (ICC Champions Trophy)

पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) :
बाबर आझम, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (उप-कर्णधार), मोहम्मद रिजवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, इमाम-उल-हक. (ICC Champions Trophy)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.