- ऋजुता लुकतुके
आयसीसीच्या २०२३ क्रिकेट पुरस्कारांसाठी नामांकनं जाहीर झाली आहेत. आणि यातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी तीन भारतीय खेळाडूंमध्येच चुरस आहे. हे खेळाडू आहेत विराट कोहली,(Virat Kohli) शुभमन गिल,(Shubman Gill) मोहम्मद शामी.(Mohammed Shami) यांच्या खेरिज न्यूझीलंडनचा डेरिल मिचेल (Daryl Mitchell) या आणखी एका खेळाडूला नामांकन मिळालं आहे.
Three batting stars and the #CWC23 leading wicket-taker 🔥
Who will claim ICC Men’s ODI Cricketer of the Year?
More: https://t.co/sJElLIPNC8 pic.twitter.com/ytjO0PxZGU
— ICC (@ICC) January 5, 2024
शुभमन गिलने (Shubman Gill) या कॅलेंडर वर्षांत १,५८४ धावा केल्या आहेत. २९ झेल टिपले आहेत. यावर्षी शुभमन गिल (Shubman Gill) दुहेरी शतक ठोकणारा वयाने सर्वात लहान क्रिकेटपटू ठरला. न्यूझीलंड विरुद्ध हैद्राबादमध्ये त्याने तडाखेबाज २०८ धावा केल्या. या वर्षभरात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण तीन शतकं ठोकली.
(हेही वाचा – ED Raids : काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि दिलबाग सिंग यांच्या घरावर ईडीचे छापे)
विराट कोहलीसाठीही (Virat Kohli) हे वर्ष यादगार ठरलं. गेल्या काही वर्षांतील मरगळ झटकून टाकत त्याने यावर्षी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम त्याने सर केला. या कॅलेंडर वर्षात विराटने १,३७७ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेत तर त्याने कमाल करताना ९०च्या वर सरासरी राखत ७६५ धावा केल्या.
मोहम्मद शामीनेही (Mohammed Shami) यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ४३ बळी टिपले आहेत. आणि विश्वचषकात तो २४ बळींसह सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. विश्वचषकातील त्याची सरासरीही १० इतकी कमी होती. तर तुलनेनं न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलची (Daryl Mitchell) कामगिरी अष्टपैलू आहे. त्याने १,२०४ धावांसह ९ बळी आणि २२ झेलही पकडले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community