कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर वर्ल्डकप टेबल टॉपर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला, कारण भारतीय संघाने 50 षटकांत तब्बल 327 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभे केले.
ICC Cricket World Cup IND vs SA या सामन्यात विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 49वे शतक पूर्ण केले आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडेत सर्वाधिक शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. वाढदिवसाला विश्वचषकात शतक झळकावणारा तो भारताचा पहिला आणि जगातील 7वा फलंदाज ठरला आहे. जेव्हा केएल राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार 22 धावा करून बाद झाला. त्याला तबरेझ शम्सीने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. श्रेयस अय्यर 77 धावा करून बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने एडन मार्करामच्या हाती झेलबाद केले. अय्यरने 17 वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. या विश्वचषकात त्याने सलग अर्धशतके झळकावली. अय्यरने कोहलीसोबत 134 धावांची भागीदारी केली.
(हेही वाचा : Happy Birthday Virat Kohli : शतकी खेळीने विराटने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी)
शुभमन गिल 23 धावा करून बाद झाला. त्याला केशव महाराजने बोल्ड केले. कागिसो रबाडाने कर्णधार रोहित शर्माला (24 चेंडूत 40 धावा) टेंबा बावुमाकरवी झेलबाद केले. रोहित शर्मा (16 षटकार) हा ब्रेंडन मॅक्युलम (17) नंतर वर्ल्ड कप पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने या वर्षात आतापर्यंत 58 षटकार ठोकले आहेत. एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 58 षटकार मारले होते.
रोहित-गिलने झंझावाती सुरुवात
पॉवरप्लेच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी स्फोटक फलंदाजी केली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर सतत दबाव कायम ठेवला. रोहित-गिल जोडीने 5 षटकांत 61 धावा केल्या होत्या. 62 धावांवर संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. येथे रोहित 24 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्याला कॅगिसो रबाडाने कर्णधार टेंबा बावुमाच्या हाती झेलबाद केले.
Join Our WhatsApp Community