ICC Cricket World Cup IND VS SA : टीम इंडियाचा सलग ८वा विजय; भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले

114

ICC Cricket World Cup IND VS SA च्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या 83 धावांत गुंडाळले. विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.

या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आजच्या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ICC Cricket World Cup च्या ३७व्या सामन्यात रविवार, ५ नोव्हेंबर रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. विराट कोहली १२१ चेंडूत १०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा १५ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या. श्रेयस आणि विराट यांच्यात १३४ धावांची शतकी भागीदारी केली. विराटने ४९व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(हेही वाचा : ICC Cricket World Cup IND vs SA : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.